मेष - आपल्यासमोर वादविवादाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवून मनोधैर्य वाढवून काम करायची वेळ आहे. कुठल्याही परिस्थितीत वाद विकोपाला जाऊन देऊ नका. वाहने सावकाश चालवा.
वृषभ - नोकरीमध्ये प्रगती आहे व्यवहार मात्र सावधपणे करायला हवेत. व्यवहारात काही धाडसी निर्णय घेणार आहात आहात. निर्णय एकदा तपासून बघणे आवश्यक आहे दूरदर्शन पणे विचार करणे आवश्यक.
मिथुन - आर्थिक स्थिती सामान्य राहणार आहे. नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काहींना प्रेमप्रकरणात यश मिळणार आहे.
कर्क - मुलांना यश मिळणार आहे. आपल्या कलागुणांना चांगला भाव मिळणार आहे आपल्या हातून कामे नियोजनपूर्वक होतील. त्यामुळे काम खूपच चांगल्या प्रतीचे होणार आहे. कामात प्रगती होणार आहे.
सिंह - ग्रह सौख्यात वाढ होणार. आहे मुलांना विविध क्षेत्रात यश मिळेल. चांगल्या संधी चालून येणार आहेत. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. मात्र त्यांच्याशी वादविवाद करू नका. मनस्ताप होईल.
कन्या - दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. व्यवसायातील काही निर्णय अतिशय चांगले ठरणार आहेत. नवीन संदेश मिळतील. आजचा प्रगतीचा दिवस आहे. प्रवासाची शक्यता आहे. सहकार्य मिळणार आहे
तुळ - घरातील वातावरण समाधान कारक असणार आहे. मानसिक शांतता ठेवून काम करा. आर्थिक व्यवहार चांगले होणार आहेत. उधारी वसूल होईल. वेगवेगळ्या कामांची तयारी ठेवा. आर्थिक प्राप्ती होईल.
वृश्चिक - आज आपली मरगळ दूर होणार आहे. काम करताना आनंद वाटणार आहे. व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवेल. दुसऱ्या व्यक्ती कडून काम करून घेणार आहात. प्लॅनिंग कामे करावीत. तर ती पूर्ण होतील.
धनु - कोणते व्यवहार घाईगडबडीने कर करू नका स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपणे आवश्यक आहे. आज उधारी देण्याचे टाळा लवकर वसूल होणार नाही. नियोजित कामे विलंबाने होतील. अनावश्यक खर्च टाळणे.
मकर - आपल्या हुशारीने लौकिक मिळवाल. चांगली माहिती गोळा कराल. नवीन लोकांच्या ओळखी होणार आहे. त्यासाठी आपणास कर्मचारी वर्गाचे सहाय्य घ्यावे लागणार आहे.
कुंभ - तुमचे महत्त्व लोकांना पटेल लोकांच्या आचार विचारांची देवाण घोळवावं होणार आहे तुमच्या कामाचे कौतुक होईल धार्मिक कामामध्ये सहभाग घेणार आहात. सरकारी कामांना गती येणार आहे.
मीन- आज आपले मनोबल चांगले राहणार आहे. नोकरीतील अस्थिरता निघून जाईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. प्रवासाची शक्यता आहे. प्रवासामधून लाभ होण्याची शक्यता आहे. अनुकूल काळ.