आजचे राशिभविष्य, १७ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 17, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 

मेष : विरोधकांनी तोंड वर काढले तरी त्याचा काही फारसा फायदा होणार नाही. आजचे धोरण ठरवताना पूर्ण विचार करून मगच अमलात आणावे.

वृषभ : नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश येण्यासाठी अडचणी येण्याचीशक्यता आहे.काही कुयोग जरी असले, तरी तुम्ही सर्व चांगल्या तऱ्हेने निभावून नेणार आहात. प्रगती होणार आहे.

मिथुन : कुठलेही काम विचारपूर्वक करा, अति धाडस करू नका. बोलताना संयम पाळा, फसवणुकीपासून सांभाळा. कोणतेही काम अर्धवट राहणार नाही याची काळजी घ्या.

कर्क : व्यापार व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे आपले काम चांगल्याप्रकारे होतील. प्रसिद्धीचे वलय राहील. कामे सुरळीत होतील.

सिंह : कामे करताना काही अडचणी आल्या तरी तुम्ही त्याच्यावर मात कराल. तुमचे नियोजन चांगले असल्यामुळे, कामामध्ये सहजता येईल. आजचा दिवस आरामात काढावासा वाटेल.

कन्या : महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात रहावे. कामानिमित्त इतरांशी संवाद साधाल. महत्त्वाच्या गाठीभेटी आज करून घ्या. कामांना वेग येईल त्यासाठी तुमचा प्रयत्न यशस्वी ठरतील.

तुळ : कुटुंबातील काही प्रश्न असतील ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील व्यक्ती समस्येवर तुमच्याकडून उपाय योजनेची अपेक्षा करतील. उधारी वसूल होऊ शकते.

वृश्चिक : आज आपणाला चांगल्या संधी प्राप्त होणार आहे. पण स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे. तुमच्याजवळ पर्याप्त वेळ आहे त्याचा उपयोग चांगला करा.

धनु : तुमच्याकडे सहनशीलता आहे, पण सातत्याने विविध गोष्टींवर विचार करून मनावर ताण येण्याची शक्यता. तुम्हाला आनंद वाटेल, ताण कमी होईल अशा गोष्टी करणे आवश्यक आहे.

मकर : आज आपण अडचणींवर मात करून काम करण्याचा प्रयत्न करावे. अति महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. गोड बोलून कामे करून घ्या .

कुंभ : नियोजनपूर्वक केलेली कामे नीट व व्यवस्थित होतील . व्यवसायवाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुठल्याही कामामध्ये नियम व अटी यांची दक्षता घ्या .

मीन : आपल्या तोलामोलाच्या व्यक्तींची व्यवहार करताना त्यामध्ये व्यवहाराचा वास्तविकतेचा जास्त विचार करावा, भावनेला महत्त्व देऊ नये.

logo
marathi.freepressjournal.in