आजचे राशिभविष्य, १८ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 18, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, १८ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - नोकरीमध्ये सुस्थिती राहणार आहे. व्यवसायांमध्ये अपेक्षित यश मिळणार आहे. नवीन कामे मिळतील. प्रवासा मुळे महत्त्वाची कामे होतील. स्वतःची अध्यात्मिक प्रगती होईल.व्यवसाय वाढीसाठी चांगले प्रयत्न कराल

वृषभ - आपले मनोबल चांगले ठेवले पाहिजे. कामातल्या अडचणींना चांगल्या प्रकारे पर्याय निर्माण कराल. कामाचा ताण वाढला तरी शांतपणे काम करा. आर्थिक धनलाभाचे योग आहेत. कामे लवकर होणार नाहीत.

मिथुन - आज आपली कामे नियोजनपूर्वक मार्गी लागणार आहे. व्यवसायात भरभराट होणार आहे. आर्थिक चांगली राहणार आहे. भागीदारीच्या व्यवसायामध्ये फायदे होतील .

कर्क - नोकरी-व्यवसायात आजचा दिवस ठीकच राहील. कामाचा ताण जाणवणार आहे. एकावेळी अनेक कामे करू नका. कामाची धांदल उडू शकते. सावकाश आणि शांतपणे कामे करा. कामे नीटनेटकी होतील.

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित येणार आहे.मुलांना यश मिळणार आहे. प्रेम प्रकरणात यश येईल.साहित्यिकांना चांगले यश मिळणार आहे. त्यांचा नावलौकिक वाढणार आहे.नवीन कामांना सुरुवात होईल.

कन्या - कामामध्ये सुरळीत पणा येणार आहे. कामे मार्गी लागतील. घरातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. भिन्न लिंगी व्यक्ती पासून सावध राहणे. अनोळखी व्यक्तींपासून दोन हात दूर रहा.

तुळ - कामाचा वेग वाढणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. त्यांना मदत करावी लागण्याची शक्यता आहे . व्यवसाय वाढीसाठी शुभ संदेश येण्याची शक्यता आहे. प्रवास होतील.

वृश्चिक -आपले पैशाचे प्रश्न सुटणार आहेत. नवी कामे मिळतील. व्यापार व्यवसायामध्ये नवे तंत्र अमलात आणाल. गृहसौख्य चांगले मिळणार आहे. प्रकृती स्वास्थ्य चांगले असेल.

धनु - मन प्रसन्न राहील अनेक कामे मार्गी लागतील. त्यामुळे मनावरचा ताण अतिशय कमी होणार आहे. आर्थिक आवक चांगली राहील.आपण सुस्थितीमध्ये येणार आहात. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणार आहात.

मकर - नोकरी मध्ये छोटे मोठे बदल होण्याची शक्यता आहे. बदल आपल्या फायद्याचेच होतील. आर्थिक व्यवहार आपल्या मनासारखे होणार आहेत. महत्वाच्या कामात सहकारी सहकार्य करतील.

कुंभ - नवीन व्यवसाय असेल तर सावधगिरीने पावले टाकने फार आवश्यक आहे. बाजारपेठेचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या. सरकारी नोकरी करणाऱ्यांचे कामे लवकर होणार आहेत.

मीन - नवीन व्यवसायातील कामे नीट आणि चांगली होणार आहेत. आपले अंदाज बरोबर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना महत्त्वाची कामे वरिष्ठांच्या सल्या प्रमाणे करण्याची आवश्यकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in