मेष - आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने मनासारखा खर्च करू शकाल. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी नवीन वस्तू खरेदी करू शकाल.
वृषभ - सामाजिकतसेच धार्मिक कार्यात रस निर्माण होईल मानसन्मान मिळून सामाजिक ठिकाणी गौरव व कौतुक होईल. समारंभाला उपस्थित रहाल.
मिथुन - कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय होतील. स्वतंत्र व्यवसायिकांना मोठे धनलाभ होऊ शकतात नवीन फायद्याचे सौदे हाती येतील.
कर्क - समारंभा सारख्या कार्यक्रमात मान अपमानाचे नाट्य रंगून रंगाचा बेरंग होऊ शकतो. स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
सिंह - नोकरीत अनुकूल घटना घडतील मान सन्मान मिळेल मोठ्या व्यक्तिगत सुवार्ता मिळतील मात्र कलह जन्य परिस्थिती पासून जपा.
कन्या - गुरुकृपा लाभेल एखादी महत्त्वाची वार्ता समजेल परंतु हितशत्रूचा त्रास होऊ शकतो आहारावर नियंत्रणाची गरज. शेती विषयक व कोर्टकचेरीच्या संबंधित कामांना गती मिळेल.
तुळ - नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीतून यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिलासादायक वातावरण असेल. प्रवासाचे योग.
वृश्चिक - इतरांवर आपली मते लादू नका. खर्चाचे प्रमाण वाढलेले असेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोके पुन्हा वर काढू शकतात. सावध राहा.
धनु - वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण हवे. व्यावसायिकांना दिलासा मिळेल. नवीन योजना अमलात आणू शकता.
मकर - नोकरी-व्यवसाय व धंद्यामध्ये दिलासादायक घटना घडून लाभाचे प्रमाण वाढेल, जुनी येणी येतील. वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करा.
कुंभ - मनाला समाधान देणाऱ्या घटना घडतील. कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम कराल. आप्तेष्ट नातेवाईकांची भेट होईल. मार्गदर्शन मिळेल.
मीन - प्रेमात यश मिळेल आवडत्या व्यक्तीच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. प्रवासाचे योग आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.