आजचे राशिभविष्य, १८ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 18, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आपल्या कामामध्ये एकाग्रता असू द्या. परिस्थितीनुसार आपल्या विचारांची दिशा बदलावी लागणार आहे. कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय पुढील पाऊल टाकू नका.

वृषभ - घेतलेली कामे जबाबदारीने पूर्ण कराल. आपल्या कार्यक्षेत्रात दीर्घकालीन विकास योजनांचा अवलंब करणे, आपणास लाभकारक ठरणार आहे. कौशल्याने काम करणार आहात.

मिथुन - काही घटना कामांमध्ये आपणास मनस्ताप होण्याचा संभव आहे. भावनाविवश होऊन करते कर्तव्यापासून अजिबात विचलित होऊ नका. मार्गक्रमण करतच रहा.

कर्क - आजचा दिवस प्रगतीचा चढता आलेख आसणार आहे. नोकरी-व्यवसायात तुमच्या कर्तुत्वाने नावलौकिक होईल. कोणत्याही आमिषाला बळी न पडता झटपट लाभाचे मार्ग स्वीकारू नका.

सिंह - व्यापार-व्यवसायात म्हणजे काही नवीन योजना कार्यान्वित करण्याचा विचार असणार आहे. त्यासाठी आपणास सातत्याने काम करावे लागणार आहे. स्वतःच्या प्रगतीचे मार्ग दिसू लागणार आहे.

कन्या - नोकरीत प्रगतीचे योग आहेत. नवीन काम हाती घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणाशीही बोलताना किंवा चर्चा करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.

तुळ - बऱ्याच गोष्टी सुखवाह होणार आहेत. आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास फायदेशीर ठरेल. व्यावसायिक धोरण आखण्यास वेळ लागेल.

वृश्चिक - व्यापार-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. थोरा थोरा मोठ्यांचे परिचय होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. आपण आपल्या कामाचे नियोजन चांगले कराल.

धनु - महत्वाची कामे पुढे ढकलावे. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये जास्तीचे काम असल्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे.

मकर - आपण जसा दिवस ठरवला आहे, त्याच प्रमाणे जाणार आहे. आर्थिक विवंचना दूर होणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यापार-व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेणार आहात.

कुंभ - व्यापार व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. आपले निर्णय अचूक ठरणार आहे. आपल्या निर्णयासाठी आपण आपल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्यास योग्य ठरणार आहे.

मीन - ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने करत राहणार आहात. कामाचा पसारा वाढणार आहे. सामाजिक क्क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. प्रवासामुळे फायदे होतील.

logo
marathi.freepressjournal.in