मेष - अपेक्षित भेटीगाठी भेटी होणार आहेत. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे.
वृषभ - आपली कामे चिकाटीने पूर्ण करावी लागणार आहेत. आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना मात्र दक्ष असणे आवश्यक आहे. दुसऱ्यावर विसंबून राहू नका.
मिथुन - आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. देवाण घेवाणीचे व्यवहार चांगले होतील. व्यापार व्यवसायातील लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे.
कर्क - नोकरीमध्ये मनाजोगती कामे होणार आहेत. कामामध्ये आपल्याला सहकार्य मिळेल. कामाचे स्वरूप बदलल्यामुळे जास्त कामाची शक्यता आहे. मनोधर्य चांगले असणार आहे. कामे व्यवस्थित कराल.
सिंह - कला क्षेत्रातील लोकांना सुसंधी लावणार आहे. नवीन निर्मितीचा आनंद घ्याल. आपली कामे दृढनिश्चयाने पूर्ण करणार आहात. | कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान होण्याची शक्यता आहे.
कन्या - महत्त्वाच्या कामांमध्ये ज्येष्ठांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासाने काम केल्यास कामे चांगली होणार आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
तुळ - नातेवाइकांच्या गाठीभेटी होणार आहेत. त्यांचे सहकार्य मिळणार आहे. कामांमध्ये महत्वाचे बदल होतील. प्रवासाची शक्यता आहे. प्रवासामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चा अंदाज घेऊनच व्यवसाय वृद्धी करावी. नोकरी मध्ये सांगली संधी येणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे
धनु - आर्थिक आवक चांगली राहणार असल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आपले मते इतरांना पटल्यामुळे आपल्याला आदर भाव मिळणार आहे. कामामध्ये प्राधान्यक्रम बदलल्यामुळे काही कामे लांबणीवर पडणार आहेत.
मकर - मोठ्या गुंतवणुकीला लांबणीवर टाका. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यापार-व्यवसायात वाढ करताना तज्ञांची मदत घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.
कुंभ - मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होणार आहेत. त्यांच्यासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित लाभ होणार आहेत नोकरी व्यवसायामध्ये चांगला दिवस आहे.
मीन - आज आपल्या कलागुणांना चांगला वाव मिळणार आहे. नवीन काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे व्यावसायिक व्यक्तींना पत प्रतिष्ठेचा लाभ होईल. आर्थिक दृष्ट्या चांगला दिवस असेल.