मेष : आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागणारआहे. प्रकृती अस्वस्थाचे कारण मानसिक असणार आहे. एखादी मनात चिंता - असली तरी त्याचा जास्त विचार करू नका.
वृषभ : आपली मते इतरांना पटवून देण्यामध्ये आपण यशस्वी होणारा आहात. जिद्द आणि चिकाटी ने आपण कार्यरत राहणार आहात. आज आपणास सर्व बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.
मिथुन : नोकरी व्यवसायात खरा पणा उपयोगात येईल. स्वतहाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. कोणाशीही वाद विवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीमध्ये कामाचा ताण असणार आहे.
कर्क : मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नोकरीमध्ये काम बदलण्याची शक्यता आहे, आपणास बद्दल स्वीकारताना मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे आहे.
सिंह : शेती विषयक कामकाजात लक्ष घालावे लागेल व ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे लागेल. घरातल्या व्यक्तींशी सुसंवाद - साधणार आहात. मोठ्या व्यक्तींकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल.
कन्या : मना वरचा ताण वाढणार आहे. नातेवाईकांशी सुसंवाद होईल, त्यामुळे आपणास प्रसन्न वाटेल. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. प्रवास होतील. खर्चाचे प्रमाण जास्त राहील.
तुळ : मानसिक प्रसन्नता लहान राहणार आहे मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.
वृश्चिक : स्वतःचे मानसिक स्थिती चांगली राहणार आहे, त्यामुळे सकारात्मक विचार केले जातील. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. सातत्याने काम होईल, महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.
धनु : कामावर मध्ये अचानक काही प्रश्न निर्माण झाले तर विचलित होऊ नका. कामाची जबाबदारी वाढणार आहे. कोणालाही जामीन राहू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
मकर : ज्येष्ठ व्यक्तींशी आपले संबंध चांगले राहणार आहेत. महत्त्वाच्या या निर्णयासाठी आपण त्यांच्याशी सल्लामसलत कराल, त्यामुळे स्वतःच्या कामाचे नियोजन तुम्ही चांगल्या प्रकारे कराल.
कुंभ : आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. कामे सहजरीत्या सुरळीत पार पडतील, त्यामुळे आपल्या कामाला उत्साह येणार आहे. कामाचे नियोजन चांगले असल्यामुळे कामे नीट वेळेत पार पडतील.
मीन : आर्थिक लाभ समाधानकारक असणार आहे. आपले अंदाज अचूक येणार आहेत. आपल्या कामातील यश म्हणजे त्यातील सातत्य हेच आहे. प्रवास होण्याची शक्यता आहे.