मेष - स्वतःचे उत्साहामुळे कामांमध्ये जबाबदारी वाढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात दिवस चांगला जाणार आहे. मनावरील ताण कमी झाल्यामुळे मन शांत राहणार आहे. व्यवसायिक फायदे होणार आहेत.
वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात जिद्दीने वाटचाल करणार आहात. नोकरीमध्ये चांगले वातावरण असणार आहे. कामामध्ये धावपळ करावी लागणार आहे. कामाचे नियोजन करा.
मिथुन - पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडून येतील. मनासारख्या घटना घडतील. प्रवास कार्यसाधक होणार आहेत. मन प्रसन्न असणार आहे. आपल्या अडचणींवर आपण मात करणार आहात.
कर्क - संघर्षाच्या पवित्र्यात राहणार आहात. घरामध्ये विसंवाद होण्याची शक्यता आहे.दुसऱ्यांच्या कामामध्ये लक्ष देऊ नका. कामामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे.
सिंह - कायद्याची बंधने पाळणे जरुरीचे आहे. कामांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये समाधान कारक परिस्थिती असणार आहे. चांगल्या संधी चालून येतील.
कन्या - नोकरीमध्ये दगदग वाढणार आहे. कामामध्ये ताण वाढणार आहे. जोडीदाराच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे. कामामध्ये उत्साह व राहणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.
तुळ - घरातल्या कुरबुरी घरातच मिटवा. व्यवसाय मध्ये नियोजन पूर्वक कामे करा अन्यथा कामे प्रलंबित राहतील. त्याचा परिणाम आपल्या नोकरीत होऊ शकतो.
वृश्चिक - आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आवक चांगली राहणार आहे. त्यामुळे घरातील वातावरण चांगले असेल. विद्यार्थी वर्गाला आज चांगला दिवस आहे.
धनु - आपण व्यवसायामध्ये कार्यरत राहणार आहात. आर्थिक आवक चांगली राहील. एखादी चांगली घटना घडणार आहे. नवीन कामांमध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.
मकर - चांगला उत्कर्षाचा दिवस असणार आहे. घरातल्या अडचणी सहजगत्या सोडवाल. त्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. घर हसत-खेळत चांगले असणार आहे.
कुंभ - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अचानक अडचणी येण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीवर छाप पाडाल. आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडणार आहात. प्रश्नांची उत्तरे सापडतील.
मीन - मनावरील ताण कमी झाल्यामुळे आपण आनंदी असणार आहात. उत्साहाने काम करणार आहात. मनात समाधान कारक विचार असणार आहे. एखाद्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.