आजचे राशिभविष्य, २ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 2, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आरोग्य उत्तम राहील आपल्या आसपास अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह उमेद वाढेल आनंदी दिवस राहील आवडत्या व्यक्तींच्या सहवासात रहाल. अचानक धनलभाचे योग.

वृषभ - आजच्या दिवशी कोणाकडूनही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. व्यवसाय धंद्यात मात्र समाधानकारक परिस्थिती राहील.

मिथुन - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल अनावश्यक खर्चाला कात्री लावा तसेच खरेदी पुढे ढकला. धावपळ होईल. कामाचा ताण जाणवेल.

कर्क - सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील जातकांना मानसन्मान मिळेल त्यामुळे उत्साह आणि उमेद वाढेल. हातातील कामे वेगाने पूर्ण होतील.नोकरीत मानसन्मान मिळेल.

सिंह - आपल्या आजूबाजूस व कुटुंबात मनोबल वाढवणार्‍या घटना घडू शकतात व्यवसाय धंद्यात आणि नोकरीच्या ठिकाणी काही वेळेस निर्णय धाडसाने घ्यावे लागतील.

कन्या - वेळेचा अपव्यय न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हितकारक राहील प्रयत्न जास्ती करावे लागतील महत्त्वाची कामे पुढे जातील. निराश होऊ नका.

तुळ - पूर्वी केलेले नियोजन सफल होताना दिसेल मन आशावादी राहील आनंदात दिवस जाईल. उत्साह आणि आनंदात रहाल. आत्मविश्वास वाढेल. प्रेमात यश मिळेल.

वृश्चिक - प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल. मन धार्मिक कार्याकडे झुकेल. एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी प्रवास घडेल. अध्यात्मात रमाल. सामाजिक कार्यात रस घ्यावासा वाटेल. खर्चात वाढ.

धनु - बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना शुभ दिवस एखाद्या महत्त्वाच्या कार्यात यश मिळेल कीर्ती संपादित करता येईल घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

मकर - प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली सरकारी स्वरूपाची कामे विनाविलंब होतील त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास सफलता मिळेल मात्र वाहने चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे.

कुंभ - आरोग्य चांगले राहून कौटुंबिक सुख मिळेल पत्नीचे सहकार्य मिळेल मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर येतील मनोबल आत्मविश्वास वाढेल.

मीन - व्यवसाय धंद्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली येणी काही प्रमाणात येतील.नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल.जोडीदाराची साथ मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in