मेष - शुभ ग्रहांचे भ्रमण आपणास क्रियाशील ठेवणार आहे. मोठ्या आर्थिक योजना आपण अमलात आणणार आहात. त्यासाठी आपणास सहकारी व मित्रपरिवार यांचा सहयोग मिळणार आहे.
वृषभ - आपले कामाचे नियोजन विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. वास्तवतेचा विचार करा. यशाकडे वाटचाल करणार आहात.
मिथुन - नोकरीमध्ये सुवार्ता कळतील त्यामुळे आपला उत्साह वाढणार आहे आनंदाने कामे कराल. व्यवसायिक नवीन करार कराल, नवीन करार करताना दक्ष राहणे आवश्यक आहे.
कर्क - निराशेची छाया जाणवेल.वादविवादाचे प्रसंग टाळलेलेच बरे. नोकरीमध्ये तणावाचे वातावरण असू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृती सांभाळा.
सिंह -आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. योजलेली कामे नीट पणे व सुरळीत पणे होतील. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगले असणार आहे. जोडीदाराचे विशेष सहकार्य लाभेल.
कन्या - नोकरीमध्ये काम करताना, आपली मानसिकता द्विधा असेल. कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे हे कळणार नाही, काम खूप असल्याने कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे.
तुळ - शुभ ग्रहांची आपल्याला साथ लाभणार आहे. आपल्या कष्टांना यश येणार आहे.एखादे निश्चित ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहात.
वृश्चिक -आपल्या व्यापार व्यवसायामध्ये काही प्रश्नांची उत्तरे आपणास समाधानकारक मिळणार आहे. जमाखर्चाचे व्यवहार आपण संतुलित ठेवणार आहात.
धनु - नातेसंबंध सुधारणा होणार आहे. आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कुशलतेने आपली कामे यशस्वी होतील. व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी आपले प्रयत्न यशस्वी होतील.
मकर -आजचा आपला दिवस समाधानकारक असणार आहे.नोकरी-व्यवसाय व्यवस्थित असल्याकारणाने आर्थिक प्रश्न राहणार नाहीत त्यामुळे कुटुंबामध्ये शांतता राहणार आहे.
कुंभ - आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे नवीन नवीन योजना समोर आल्या तरी, कुठल्या घ्याव्या याचा प्रश्न पडला पडणार आहे, नीट अभ्यास करून संधीचा फायदा घ्यावा.
मीन -आपल्याला आपल्या कामात जास्त लक्ष घालावे लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कामात चुका होऊ देऊ नका. व्यवहार करताना नियम व अटी यांचा अवलंब काटेकोरपणे करावा.