आजचे राशिभविष्य, २ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 2, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 

मेष - धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मात्र प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मन आनंदी ठेवा पचण्यास हलका व सात्विक आहार घ्या. जास्त दगदग करू नका प्रवास करण्याची शक्यता.

वृषभ - आर्थिक परिस्थिती योग्य राहील, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मन शांत ठेवा व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रवासाचे योग आहेत जोडीदार आणि मुले यांच्याशी गोडीने बोला.

मिथुन - नोकरीमध्ये कामाचा ताण असला तरी तुम्ही सातत्याने काम करा. काही बदली ची कामे मिळतील. काहींना कामानिमित्त प्रवास घडू शकतो. जोडीदार आपली काळजी घेईल.

कर्क - मनोबल चांगले असेल. कामाची दगदग वाढली तरी कामामध्ये आनंद वाटेल. महत्वाची आणि सरकारी कामे करून घ्या ती सहजरीत्या होतील वरिष्ठांची मर्जी संपादित कराल.

सिंह - मनावरील कामाचा ताण खूप कमी होईल. व्यवसायामध्ये एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. मात्र धावपळ होईल. नियोजनपूर्वक काम केल्यास दगदग वाचेल.

कन्या - मन स्थिर ठेवा. आत्मविश्वास पूर्वक काम करणे आवश्यक आहे. तब्येतीकडे लक्ष देऊनच काम करणे आवश्यक आहे. शक्यतो जास्त काम करणे टाळा. आर्थिक आवक चांगली राहील.

तुळ - गृह सौख्यात वाढ होईल. आर्थिक बाजू बळकट राहील. कुटुंबासाठी खर्च कराल. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक. मनाला वाटेल असे काही काम करा.

वृश्चिक - प्रवास करताना सांभाळून करा. पाकीट सांभाळा. पैतृक संपत्तीमध्ये काही वाद असतील तर ते प्रश्न सुटतील. आर्थिक लाभ होतील, पण काम जास्त करावे लागणार आहे.

धनु - मुलांच्या शैक्षणिक बाबतीत काही प्रश्न असल्यास जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या. काही गुंतागुंतीची कामे मार्गी लावाल. ज्येष्ठ मंडळींनी योग्य सल्ला मिळेल. भावंडांशी गाठीभेटी होतील.

मकर - आवडत्या व्यक्तीचे संभाषण फोनवर होऊ शकते मन मोकळे बोलण्यामुळे मन हलके होईल नोकरीतील वाद-विवादापासून दूरच राहा पैशाची सोय होईल. सामाजिक कार्यामध्ये व्यस्त रहाल.

कुंभ - आरोग्यात सुधारणा होईल काम करण्यासाठी उत्साह आहे आवश्यक तो खर्च करावाच लागेल खर्च वाढला तरी आवक चांगली असेल व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये लक्ष ठेवा.

मीन - सामाजिक किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. धार्मिक कार्यामध्ये दानधर्म होईल. प्रवासाची शक्यता आहे. मन आनंदित ठेवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल.

logo
marathi.freepressjournal.in