मेष : आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याचा आनंद व समाधान मिळणार आहे. नातेवाईक मित्रपरिवार यामधील कोणास तरी आपल्याला मदतीची गरज भासेल ती पूर्ण करणार आहात.
वृषभ : आपल्या अंगी खूप गुण आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या कामांमध्ये आनंद घेता. आपल्याला महत्त्वाच्या कामांत मित्रांची मदत मिळेल. थांबलेली कार्ये हातवेगळी करू शकाल.
मिथुन : पण जे काम करता ते अत्यंत व्यवहारी दृष्टिकोनातून करता. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आजच्या कामांना चांगल्याप्रकारे प्राधान्य द्याल. चांगल्याप्रकारे आर्थिक फायदा होईल.
कर्क : आजचे व्यवहार करताना खूप दक्ष असले पाहिजे. आर्थिक देवाण-घेवाण नीट करा. फसवणुकीच्या घटना घडू नयेत याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
सिंह : आपल्या आजूबाजूचे वातावरण एक चांगल्या प्रभे खाली भारलेले असेल. आपली विचाराधीन असलेली कार्य पूर्ण होताना बघून, उत्साही रहाल.आपल्या व्यापारत फायद्याचे प्रमाण वाढेल.
कन्या : सरकारी अधिकारी संरक्षण दलातील कर्मचारी इत्यादींना मानसन्मानाचे योग मिळणार आहे. स्वतःच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती पथावर असाल. व्यापार-व्यवसायात गती मिळेल आहे.
तुळ : कार्यक्षेत्रत काही कारणांसाठी ओळखीचा वापर करावा लागेल. एखादी नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत असाल तर आत्मविश्वासाने कार्य हाती घेऊन ते पूर्ण करण्यात यश येईल.
वृश्चिक : आज नुकसान भरपाई तून लाभान्वित होण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. अति आत्मविश्वास टाळा आपल्या वर्तणुकीने बोलण्याने इतरांना दुखवुन कायमचे शत्रू तयार करू नका.
धनु : नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. कामाचा ताण कमी असेल. व्यापार व्यवसायिकांना लाभाचे प्रमाण वाढणार आहे. भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराचे सहाय्य लाभेल.
मकर : व्यापार व्यवसायिकांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये हाताखालील व्यक्तींकडे चांगले लक्ष ठेवणे गरजेचे आहे.आपल्या कामांमधील कामचुकारपणा किंवा आर्थिक हानी होते की नाही हे लक्ष ठेवा.
कुंभ : आपणास ग्रहांची अनुकूलता लाभणार आहे.सर्व प्रकारच्या बाबींनी लाभान्वित होणार आहात. आपल्या क्षेत्रातली कार्य अल्प प्रयत्नांनी पूर्णत्वास जातील. तरुण-तरुणींचे प्रश्न समस्या सुटतील.
मीन : बरेच दिवस प्रलंबित झालेली कामे आज पूर्ण करून घ्या. जमिनी विषयक स्थावर मिळकती संबंधी व्यवहारांत गती मिळून व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील.ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल.