मेष - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी संधी येणार आहे. आपण आपले काम नियोजन पूर्व व सातत्याने करणार आहात. काम चांगले झाल्यामुळे वरिष्ठांची मर्जी राहणार आहे. नवीन कामे मिळतील.
वृषभ - व्यापार व्यवसाय मध्ये चांगले निर्णय घेणारा आहात. आपल्या कार्यक्षेत्रात तुमचं म्हणणे प्रत्येक व्यक्ती मनापासून ऐकेल. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने मानसिक समाधान लाभणार आहे.
मिथुन - इच्छा नसताना काही कामे करावी लागणार आहेत. मानसिकता खराब होण्याची शक्यता आहे. आवश्यकता नसताना जास्त विचार करू नका. शांतपणे निर्णय घेऊन काम करण्याची वेळ आहे.
कर्क - आजच्या तुमच्या आनंदे वृत्तीमुळे कामाचा वेग वाढणार आहे. आवडत्या कामामध्ये काम करावयास मिळणार आहे. जोडीदाराचे आपल्याला सर्व प्रकारे साहाय्य लाभणार आहे. आर्थिक नियोजन ठीक असेल.
सिंह - एखाद्या धुर्त व्यक्ती चा सामना करावा लागणार आहे. तुमची हुशारी पणाला लागणार आहे. नोकरी मध्ये समाधानकारक स्थिती असणार आहे. शत्रु काढण्याचा प्रयत्न करेल. त्यांचा हुशारीने सांग ना कराल.
कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात आपले निर्णय चांगली होणार आहेत. ऊर्जेची पातळी चांगली असणार आहे. मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीमुळे घरातील वातावरण आनंदी असणार आहे. नवीन संधी येतील.
तुळ - आज शांततेत दिवस घालवण्याचा तुमचा मानस असणार आहे. जास्त धावपळ आणि दगदग नको वाटेल. कुटुंबासमवेत आनंद साजरा कराल. अचानक प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - नवीन कामासाठी परदेशातून शुभ संदेश देऊ शकतात. बहिण भाऊ यापैकी कोणाला तरी आर्थिक मदत लागू शकते. त्या बाबत जोडीदाराशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
धनु - आज स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे. आपल्या बोलण्यातून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. नोकरी-व्यवसायात विचारपूर्वक निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.
मकर - आपला कंटाळा जाणार आहे आजच्या दिवसाची इच्छा वाढणार आहे सातत्याने केलेल्या कामाची फळे चांगली मिळेल जाणार आहे सहकार यांच्या संवादातून वेळेचा सदुपयोग होणार आहे.
कुंभ - देणे घेण्याचे व्यवहार चांगले सांभाळून केले पाहिजे. समोरच्या व्यक्तीसाठी विनाकारण खर्च करताना विचार करणे आवश्यक आहे. काही कामांसाठी प्रवास करण्याची शक्यता आहे.
मीन - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती झाल्याने आपण आनंदी असणार आहात. आजच्या दिवशी आपणास जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. संवाद साधणार आहात. मनोरंजनासाठी वेळ देणार आहात.