मेष - दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आवश्यक असलेल्या गाठीभेटी व मुलाखती होतील अपेक्षित पत्रव्यवहार होईल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ - आपल्या जवळील मौल्यवान वस्तू अथवा घरातील मौल्यवान चिजा व महत्त्वाची कागदपत्रे तसेच वाहने सुरक्षित लक्षपूर्वक ठेवा गहाळ होण्याची शक्यता आहे.
मिथुन - कुटुंबातील तरुण-तरुणींच्या एक समस्या सुटतील प्रश्न मार्गी लागतील. विरोधक तसेच इतर शत्रूंवर विजय मिळवू शकाल.
कर्क - हाती घेतलेल्या सर्व प्रकारच्या कामात सुयश लाभेल. समाजातील मान्यवर व विचारवंत व्यक्तींच्या सहवासाचा लाभ मिळेल.
सिंह - एखादी महत्त्वाची घटना अथवा दीर्घकालीन रखडलेले काम होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण कराल.
कन्या - कौटुंबिक सुख मिळेल. कुटुंबात संवाद राहील. व्यवसाय धंद्यात जुनी येणी वसूल होतील परंतु स्वतःच्या बोलण्यावर ते नियंत्रण ठेवा.
तुळ - उत्साह व आनंददायकघटना घडल्यामुळे मनोबल उच्च प्रकारचे राहील. नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. मनोबल वाढेल आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक - जुने मित्र भेटल्यामुळे त्यांच्या सहवासात व जुन्या आठवणीत रमून जाल. मनोरंजनाकडे कल राहील. मात्र व्यसने व जुगार सदृश्य व्यवहार यांच्या पासून अलिप्त राहा.
धनु - अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील काहींना प्रवासाचे योग येतील प्रवासात खाण्यापिण्यावर ते नियंत्रण हवे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
मकर - नोकरीतील परिस्थिती उत्तम राहील. नवीन नोकरी बाबत हालचाली यशस्वी होतील. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
कुंभ - नोकरीच्या ठिकाणी अथवा व्यवसाय धंद्यात महत्त्वाचे करारमदार होऊ शकतात फायदेशीर सौदे हाती लागतील. व्यापार विस्तार करू शकाल.
मीन - महत्त्वाच्या कामासाठी जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची मदत होऊ शकेल.