आजचे राशिभविष्य, २० मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 20, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष -आपल्या व्यापार व्यवसायाला गती येणार आहे नवीन आशादायक चित्र समोर असणार हे काम करताना जास्त घाई गडबड करू नकानवीन कामांना पुरेसा वेळ द्यावा लागणार आहे.

वृषभ - काहीना काही कारणाने हा आपल्या कामांमध्ये व्यत्यय येणार आहे, त्यामुळे कामास उशीर होऊ शकतो. मानसिकता चांगली ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन - प्रसन्न मनाने व कामाला सुरुवात करणार आहात. जोडीदाराशी सामान्य संबंध राहतील. व्यवसायात आघाडी घ्याल, स्थिती चांगली राहील.

कर्क - नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावयास पाहिजे. व्यापार व्यवसायातील लोकांनी मोठे निर्णय घेऊ नका. आपल्या व्यवसायात प्रगती होणार आहे.

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण नवीन नवीन कल्पना अमलात आणणार आहे. व्यवहारचातुर्य वापराल यामुळे कामामध्ये यश येणार आहे. आपणास मुलांचेही सहकार्य मिळणार आहे.

कन्या - घरातील वातावरण शांत ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. मनाचा मोठेपणा दाखवून आपणच थोडी माघार घेतली तर कटुता कमी होईल.

तुळ - आपण आपल्या कार्यामध्ये सातत्याने काम करत राहाल. आपलं कार्यक्षेत्र कसे विस्तार होईल याचे नियोजन करावे. या कामांमध्ये आपणास बहीण-भावांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - काही चिंता आपणास सतावत होत्या त्या दूर होणार आहे. कामामध्ये मनासारखी प्रगती होणार आहे. पैशाचे फायदे जास्त प्रमाणात होतील. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढणार आहे.

धनु - शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.उत्साह व आनंद असल्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचा चांगला प्रभाव पडणार आहे.आपल्या कामाला गती येईल.

मकर - अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कामातील वेळ वाया जाणार आहे. कामाच्या विलंबामुळे, मानसिकता खराब होण्याची शक्यता आहे.

कुंभ - सकारात्मक विचाराने नोकरीमध्ये चांगली स्थिती निर्माण होणार आहे. महत्वाच्या जबाबदार्‍या सांभाळताना, आपणास सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार आहे.

मीन - नोकरी व्यवसाय मध्येआपल्या कामाला जास्त महत्त्व दिले जाणार आहे. आपण काम करताना कौशल्याने व सातत्याने काम केल्याने त्याचा मोबदला योग्य रित्या मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in