आजचे राशिभविष्य, २० मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 20, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष -अनुकूल दिवस जाईल. हाती घेतलेली कामे पूर्ण कराल नोकरी चांगली परिस्थिती राहील तुमचे निर्णय योग्य ठरतील रखडलेला कामांना गती मिळेल कामाचा ताण कमी होईल.

वृषभ - ग्रहमानाची साथ मिळाल्यामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल कुटुंबात किंवा आपल्या कार्यक्षेत्रात आपले मत ग्राह्य धरली जाईल आपला अभिप्राय घेतला जाईल.

मिथुन - रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल मन प्रसन्न राहील नोकरी उत्तम परिस्थिती राहील मात्र काहींची बदली होण्याची शक्यता आहे.

कर्क - आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहता येईल नातेवाईक मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी होतील आर्थिक परिस्थिती ठीक राहील महत्त्वाच्या कामांना गती देण्यात यशस्वी व्हाल.

सिंह - महत्त्वाची कामे करण्यासाठी उत्तम काळ आहे परिचित लोकांची मदत मिळेल मनात सकारात्मक विचार राहतील जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल आर्थिक बाजू चांगली राहील.

कन्या - नोकरीत जास्तीचे काम करावे लागल्यामुळे धावपळ करावी लागेल एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल संयम ठेवण्याची गरज आहे.

तुळ - नशिबाची साथ मिळाल्यामुळे धनलक्ष्मीची कृपा राहील व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल समाजातील मान्यवर यांच्या भेटीगाठी होतील मान-सन्मान मिळेल.

वृश्चिक - नोकरीत प्रगती ची शक्यता वरिष्ठांचे तसेच हाताखालील हकार्‍यांचे सहकार्य मिळेल. एखादी शुभवार्ता मिळू शकते नवीन संधी चालून येतील आर्थिक आवक मनासारखी राहील.

धनु - कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळत राहतील शुभ घटना घडतील. मन धार्मिक तेकडे झुकेल पूजापाठ करण्यात रंगून जाल मनाला प्रसन्नता प्राप्त होईल नोकरीत प्रामाणिकपणे काम कराल.

मकर - काही कारणास्तव प्रवास घडण्याची शक्यता प्रवास रद्द होऊ शकते नोकरीत सर्वसामान्य परिस्थिती राहील नोकरीतील राजकारण तसेच गटबाजीचा त्रास होऊ शकतो.

कुंभ - चांगल्या घटना घडतील जीवन साथी अशी मधुर संबंध राहतील प्रेमात यश संपादित करू शकाल आर्थिक आवक बऱ्यापैकी राहील व्यवसायात अनुकूल घटना घडतील.

मीन - व्यवसाय-धंद्यात अनुकूल वातावरण राहील नोकरीत प्रगती होईल प्रलंबित कामे हातावेगळी करता ना थोडा संयम आवश्यक राहील.

logo
marathi.freepressjournal.in