मेष - व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहून उत्सव प्रदर्शनातून लाभ होतील तरुण-तरुणींचे बलवत्तर विवाहयोग आहेत नोकरीच्या संधी मिळू शकतात वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील.
वृषभ - व्यावसायिक प्राप्ती वाढेल प्रेमात यश मिळवून काहींचे परिचयोत्तर विवाह ठरण्याची शक्यता तिकडे कल राहील वैयक्तिक समारंभातून कौतुक होईल.
मिथुन - गतिमान घटना घडू शकते. महत्त्वाची घटना घडल्यामुळे आत्मविश्वास वाढेल महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी यशस्वी होतील काही सुवार्ता मिळतील.
कर्क - नोकरीधंद्यात अनुकूलता लाभेल कुटुंब परिवारात एखादा समारंभ करू शकाल नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगणे हितकारक ठरेल.
सिंह - व्यवसाय धंदा आजारांची शक्यता मात्र कायदेशीर बाबी तंतोतंत पाळणे हितकारक ठरेल व्यवसायिक मोठे लाभ मिळू शकतात नव्या ओळखीतून लाभ होतील.
कन्या - सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्या उत्सव समारंभातून - उपस्थित राहावे घरातील वातावरण चांगले राहून आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील.
तुळ - पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल उत्तम लाभ होण्याची शक्यता व्यवसाय धंद्यातील विशिष्ट मार्केटिंग यशस्वी होईल रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण होतील.
वृश्चिक - काहींना अचानक जाणार आहे नव्या ओळखीतून लाभहोतील वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील जाहिरात माध्यमातून यश मिळेल थोरामोठ्यांच्या गाठी भेटीतून लाभदायक दिवस.
धनु - अतिशय ऊर्जा संपदा दिवस राहील तरुण-तरुणींना कला छंद व इतर बौद्धिक उपक्रमातून चांगले यश मिळविता येईल नव्या व्यावसायिक उपक्रमातून उत्तम प्राप्ती होऊ शकते.
मकर - कुटुंब परिवारातील वातावरण सुखदायक राहील विवाह सारखे कार्य ठरतील वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील तरुण-तरुणींच्या इच्छा पूर्ण होतील आलेली संकटे परस्पर जातील.
कुंभ - आज आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातील नवीन नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल कौटुंबिक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे लागेल.
मीन - सामाजिक कार्यक्रमांची बोलावणे येतील उत्सव समारंभातून उपस्थिती लावावी व्यवसाय विस्ताराच्या नियोजनात सफलता मिळू शकते नोकरीच्या मुलाखती यशस्वी होऊन नोकरी मिळेल.