आजचे राशिभविष्य, २२ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 22, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आर्थिक व्यवहार सावधानतेने केलेले बरे. फसवणुकीची शक्यता कोणावरही जास्त विश्वास नको मनाला नियंत्रणात ठेवा.

वृषभ - आपण घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल काही चांगल्या गोष्टी घडतील लोकांचा सल्ला आपल्याला उपयोगी पडू शकतो. मित्रमंडळींना मदत कराल.

मिथुन - दीर्घकाळ प्रलंबित राहिलेली कामे वेगाने पूर्ण होण्याची शक्यता मनोरंजनात दिवस मजेत जाईल. धनलाभ होईल.

कर्क - आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे आपली कामे सुरळीत होतील अतिआत्मविश्वास व अति धाडस नुकसानकारक ठरू शकते.

सिंह - नशिबाची साथ मिळेल आपल्या बोलण्याने लोकांच्या शंकांचे निराकरण कराल आपला इतरांवर प्रभाव राहून मानसन्मान मिळेल.

कन्या - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. दुहेरी मनस्थिती दिवसभर राहू शकते. लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

तुळ - संबंधित व्यक्तीशी आपुलकीने वागा त्याचप्रमाणे बोला. कुटुंबातील सदस्यांची मते विचारात घ्या. इतरांवर आपली मते लादू नका.

वृश्चिक - आपल्या वर्तणुकीने अथवा बोलण्याने जवळच्या व्यक्तींचे गैरसमज होऊन त्याचे वादविवादात रुपांतर होऊ शकते. इतरांना मदत करा.

धनु - धाडसी निर्णय घेऊ शकाल. जुन्या गुंतवणुकी भरघोस फायदा देतील. नव्या गुंतवणुकी करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.

मकर - लहान अथवा मोठ्या कोणत्याही कौटुंबिक बाबींमध्ये कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून मगच निर्णय घ्या. गैरसमज होऊ देऊ नका योग्य मार्गाने पुढे जा.

कुंभ - धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी आपल्या खर्चाने सक्रिय योगदान द्याल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च होत असल्याने मनास आनंद वाटेल.

मीन - आज दिवसभरात चांगले लोक संपर्कात येतील परंतु आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा लोकांवर भरोसा ठेवताना पूर्ण विचारांती भरोसा ठेवा.

logo
marathi.freepressjournal.in