आजचे राशिभविष्य, २२ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 22, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - कोणावरही अवलंबून न राहता आपली वाटचाल आपण करा. व्यापार-व्यवसायात व्यवस्थेचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. दैनंदिन नियोजनपूर्वक आखल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील.

वृषभ - शक्ती पेक्षा युक्ति ने मार्ग काढाल. ते तुमच्याच फायद्याचे आहे. नोकरदारांनीअधिकाराच्या मर्यादा ओलांडू नये. मित्र मंडळी वर जास्त विसंबून राहू नका. आर्थिक उलाढाली चांगल्या होतील.

मिथुन - कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास मिळालेल्या संधीचे सोने करा. लक्ष्मी प्राप्तीचे योग आहेत. भाग्याची साथ मिळेल. प्रवासाची शक्यता धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात.

कर्क - गृहकलह क्लेशदायक असतात याचा प्रत्यय आपल्याला येणार आहे. कामानिमित्त होणाऱ्या प्रवासात त्रास संभवतो. काळजी घ्या. अनावश्‍यक खर्चाला कात्री लावावी लागणार आहे.

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात आपण कर्तबगारीचा ठसा उमटवणार आहात.विरोधकांना न दुखावता त्यांना खडे बोल सुनावले तर सरशी तुमचीच आहे. दिवस आपणास सुखावह जाणार आहे.

कन्या - आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य यावर अधिक लक्ष देणे जरुरी आहे. प्रलोभनांपासून सावध राहणे. महिलांनी आहार व्यवहाराची बंधने पाळावी. प्रकृती कडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तुळ - कामाची घोडदौड वेगाने होत राहणार आहे. आत्मविश्वास आपल्या क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे. प्रतिष्ठित व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल.

वृश्चिक - दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वकर्तृत्वावर भर दिला तर सरशी होईल. महत्त्वाची कामे पार पडतील. संवादातून आर्थिक प्रगती साधता येईल. जमीन जुमल्ल्याची प्रकरणे हातावेगळी करता येतील.

धनु- कुणी कुणाचा कायमचा नसतो हे जाणून वागलात तर मनस्ताप होणार नाही. नातेवाईकांचे वागणे खटकले तरी लगेच त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. उद्योगधंद्याच्या निमित्ताने प्रवास होईल.

मकर - नात्यातील प्रेमळ धागा जपला तर फायदा तुमचाच आहे. गोड बोलून कामे करून घ्या. आर्थिक नियोजन चांगले असणार आहे. आर्थिक फायदे होणार आहेत.

कुंभ- मानसिक अशांतता दूर झाल्याने प्रसन्ना असणार आहात. नवीन कामाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला जाणार आहे.

मीन- पेराल तेच उगवणार आहे. शब्दाने शब्द वाढवू नका. विरोधकांच्या हाती आपली महत्त्वाची माहिती जाणार नाही याची खबरदारी घ्या.जमतील तेवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारा.

logo
marathi.freepressjournal.in