आजचे राशिभविष्य, २२ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 22, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - कामाची गती वाढविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता. आपल्या कला व छंदासाठी पुरेसा वेळ दिल्यास मन ताजेतवाने होण्यासाठी मदत होईल. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल.

वृषभ - आपल्या कार्यस्थळी आपल्या बुद्धी कौशल्याचे कौतुक होईल मुत्सद्दी पणाने निर्णय घ्याल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता इतरांना मदत कराल.

मिथुन - नोकरीधंद्यात चांगली परिस्थिती राहील नवीन संधी मिळतील पण त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील आर्थिक परिस्थिती समाधान कारक राहील.

कर्क - अनुकूल घटना घटित होतील कामात उत्साह राहील भाग्याची साथ राहील इतरांशी असलेले गैरसमज दूर करण्यात यश मिळेल पैशांची आवक चांगली राहील.

सिंह - घरगुती तसेच व्यवसाय धंद्यातील कामासाठी जास्त परिश्रम घेतले गेल्यामुळे दमछाक होईल कामे किचकट होतात असे वाटेल. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक.

कन्या - नोकरीत प्रगती होईल कामाचा आणि जबाबदारीचा सतत विचार करू नका घरातील सदस्यांसाठी वेळ द्या आपल्या आवडत्या छंदांसाठी व कलेसाठी वेळ द्या.

तुळ - आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसाय धंद्यातील जुनी ऑडी वसूल होतील उत्पन्नातून काही शिल्लक राहील याची काळजी घ्या अनावश्यक खर्च टाळा.

वृश्चिक - जमीन जुमला स्थावर मिळकत याविषयीची कामे होतील नोकरीतील दिवस सर्वसामान्य असेल संघर्षातून शांतपणे मार्ग काढणे योग्य ठरेल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय भाग घ्याल.

धनु - यशाच्या वार्ता कानावरती पडतील चांगला काळ आहे आपली बाजू वरचढ ठरून इतरांवर आपला प्रभाव राहील मात्र व्यवसायात सामान्य स्थिती राहील.

मकर - अपेक्षेप्रमाणे कामे होणार नाहीत तसेच आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे हितकारक ठरेल खाण्यापिण्याची काळजी घ्या.

कुंभ - नोकरीधंद्यात आपले वर्चस्व राहील वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील हकार्‍यांना सांभाळून घ्या आर्थिक बाबतीतील अंदाज बरोबर ठरतील.

मीन - जीवनसाथीला समजून घ्या घरामध्ये एखादे छोटेसे धार्मिक कार्य घडेल तरुण-तरुणींना प्रेमात यश लाभेल नोकरीत चांगली परिस्थिती राहील व्यवसायात भरभराट होईल.

logo
marathi.freepressjournal.in