मेष - तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सांगितल्यास ते आपणास सर्वतोपरी मदत करण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका.
वृषभ - जे जातक नोकरी करत आहे, अशा जातकांना आज आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टीने सहमत आहे.
मिथुन - इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करणार आहात. आपले वैवाहिक आयुष्य आनंदी आणि समाधानी असेल. सामाजिक कार्य करताना आपणास आनंद होणार आहे.
कर्क - आपण एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आज आपण दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. व्यापार व्यवसायामध्ये आर्थिक फायदा होणार आहे. आपण आनंदी आणि उत्साही असाल.
कन्या - नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामे नीटनेटकी करणे आवश्यक आहे. कामाकडे दुर्लक्ष करू नका, चुका झाल्यास ताण येणार आहे.
तुळ - आज आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे आपल्या लिखाणात किंवा कवितेला प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी येतील.
वृश्चिक - आपले सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहणार आहेत. आपल्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. एखादी चांगली बातमी समजण्याची शक्यता आहे. कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे.
धनु - नवीन प्रगतीचे मार्ग समोर येणार आहेत. जास्तीच्या कामाने आपल्याला ताण शक्यता आहे. आनंदाने व सातत्याने काम केल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक उन्नती होणार आहे.
मकर - आपणास आज कुटुंबातून सहकार्य मिळणार आहे. आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. आपल्याकडे पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यांचे स्वागत आपण चांगले करणार आहात.
कुंभ - आज आपले मनोबल उत्तम असणार आहे. आपल्या कामाला सुरुवात उत्साहाने आनंदाने करणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन अनेक संधी येण्याची शक्यता आहे.
मीन - नोकरी व्यवसायातील आपले टार्गेट पूर्ण झाल्यामुळे आपण आनंदित असणार आहात. आपणास मित्रांचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे काम उत्तम होणार आहे.