मेष : आज आपण आपल्या कार्यक्षेत्र ला जास्त महत्त्व देणार आहे. काही सरकारी काम असतील तर ती पण होतील. दगदग आणि धावपळ न करता आपली कामे सुरळीत करण्याचा प्रयत्न करा.
वृषभ : दूरदृष्टी ठेवून कार्याला आरंभ करणार आहात. सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणार आहात. आपणास लोकांचे आशीर्वाद मिळतील. व्यापार व्यवसायात मोठी उलाढाल होईल नफ्याचे वाढेल.
मिथुन : कामामध्ये धरसोड वृत्ती नको. घेतलेले काम सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अडचणी आल्या तरी त्या सुटतील. कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव घेऊ नका. आर्थिक लाभ होईल.
कर्क : व्यापार व्यवसायातील भागीदार बरोबरचे वाद मिटतील. जुने गैरसमज दूर होतील. आपल्या हातून जास्त परिश्रम व कौशल्यपूर्ण कामाने आपण उत्साहित होणार आहे. व्यर्थ प्रवास टाळलेले चांगले.
सिंह : आपल्या नोकरी-व्यवसायात वातावरण चांगले असणार आहे, काम जरी जास्त असले तरी आपण आपल्या हाताखालच्या व्यक्तींची मदत घ्याल. शत्रूंच्या कारवायांवर मात देणार आहात.
कन्या : विद्यार्थी वर्गाला आजचा दिवस अनुकूल असणार आहे. त्यातल्या त्यात जे विद्यार्थी कलाक्षेत्रात आहे त्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत.आपल्या कौशल्याला वाव मिळणार आहे.
तुळ : आर्थिक नियोजन करताना, घरातील व्यक्तींचे सहाय्यक घ्यावे लागणार आहे. कोणतेही निर्णय घेताना घाई नको. अचानक खर्च वाढणार आहे. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
वृश्चिक : मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. कुठल्याही प्रकारचा मनस्ताप करून घेऊ नका, किंवा वादविवाद यांमध्ये पडू नका. मनासारखी खरेदी करा. पैशाची आवक चांगली राहणार आहे.
धनु : आर्थिक परिस्थिती सामान्य राहणार आहे. मात्र कुटुंबासाठी खर्च होणार आहे. गृहसौख्य मिळाल्याने आपण समाधानी राहाल. घरामध्ये पाहुण्यांची इच्छा असू शकते. कोणते मोठे धाडस नको.
मकर : नोकरीमध्ये संघर्षमय परिस्थिती येऊ शकते, तरीही आपले वर्चस्व राहणार आहे. नवीन परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपले कार्य पूर्ण कराल.
कुंभ : जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका. आर्थिक परिस्थिती सामान्य आहे. कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे. प्रवासामध्ये त्रास संभवतो. तब्येतीला जपणे आवश्यक आहे .
मीन : नवीन परिचय आणि ओळखी होतील.आपल्या ओळखीचा फायदा नोकरी-व्यवसायात होऊ शकतो आर्थिक उलाढाल वाढणार आहे .लाभाचे प्रमाण वाढणार आहे चैनीला प्राधान्य द्याल