मेष -आज आपण आपल्या कार्यक्षेत्र ला जास्त महत्त्व देणार आहे. काही सरकारी काम असतील तर ती पण होतील. दगदग आणि धावपळ न करता आपली कामे सुरळीत करण्याचा प्रयत्न करा.
वृषभ - दूरदृष्टी ठेवून कार्याला आरंभ करणार आहात. सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणार आहात. आपणास लोकांचे आशीर्वाद मिळतील.
मिथुन - कामामध्ये धरसोड वृत्ती नको. घेतलेले काम सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अडचणी आल्या तरी त्या सुटतील. कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव घेऊ नका.
कर्क - व्यापार व्यवसायातील भागीदार बरोबरचे वाद मिटतील. जुने गैरसमज दूर होतील. आपल्या हातून जास्त परिश्रम व कौशल्यपूर्ण काम याने आपण उत्साहित होणार आहे.
सिंह - आपल्या नोकरी-व्यवसायात वातावरण चांगले असणार आहे, काम जरी जास्त असले तरी आपण आपल्या हाताखालच्या व्यक्तींची मदत घेणार आहात.
कन्या - विद्यार्थी वर्गाला आजचा दिवस अनुकूल असणार आहे. त्यातल्या त्यात जे विद्यार्थी कलाक्षेत्रात आहे त्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत.आपल्या कौशल्याला वाव मिळणार आहे.
तुळ -आर्थिक नियोजन करताना, आपणास घरातील व्यक्तींचे सहाय्यक घ्यावे लागणार आहे. कोणतेही निर्णय घेताना घाई गडबड करू नका. अचानक खर्च वाढणार आहे.
वृश्चिक - मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. कुठल्याही प्रकारचा मनस्ताप करून घेऊ नका, किंवा वादविवाद यांमध्ये पडू नका. मनासारखी खरेदी करा. पैशाची आवक चांगली राहणार आहे.
धनु -आर्थिक परिस्थिती सामान्य राहणार आहे. मात्र कुटुंबासाठी खर्च होणार आहे. गृहसौख्य मिळाल्याने आपण समाधानी राहणार आहात. घरामध्ये पाहुण्यांची इच्छा असू शकते.
मकर - नोकरीमध्ये संघर्षमय परिस्थिती येऊ शकते, तरीही आपले वर्चस्व राहणार आहे. नवीन परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.
कुंभ - जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका. आर्थिक परिस्थिती सामान्य आहे. कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे. प्रवासामध्ये त्रास संभवतो. तब्येतीला जपणे आवश्यक आहे.
मीन - नवीन परिचय आणि ओळखी होतील.आपल्या ओळखीचा फायदा नोकरी-व्यवसायात होऊ शकतो आर्थिक उलाढाल वाढणार आहे. लाभाचे प्रमाण वाढणार आहे. चैनीला प्राधान्य द्याल.