आजचे राशिभविष्य, २३ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 23, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - स्थायी संपत्ती जमीन इत्यादी मालमत्तेच्या कामात सावधानता बाळगा कागदपत्रे वाचूनच सही करा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. प्रवासाचे योग आहेत खाण्यापिण्याचे पथ्य पाळले पाहिजे.

वृषभ - भाग्याचे पाठबळ आपल्याला लाभल्यामुळे आपली इच्छापूर्ती होईल जीवनसाथी चांगली साथ देईल थोडा ताण तणाव राहील मात्र संयम आणि कौशल्याने परिस्थितीतून मार्ग काढू शकाल.

मिथुन - काही महत्त्वाच्या कामात अडचणी आल्या मुळे अस्वस्थ वाटून मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. थोडा संयम बाळगायला हवा कामे पूर्ण होतील.

कर्क - आर्थिक आवक चांगली राहील नोकरीत परिस्थिती समाधानकारक राहील कुटुंब परिवारात किरकोळ कारणांवरून वाद होऊ शकतात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे हितकारक ठरेल.

सिंह - नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहिली तरी बदली होऊ शकते स्थान बदल किंवा कामातील बदल स्वीकारावा लागेल एखादी नवीन जबाबदारी मिळेल.

कन्या - नशिबाची साथ मिळेल महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील ओळखी मध्यस्थी तून कामे पूर्ण करू शकाल काहींना प्रवास करावा लागेल प्रवासाच्या नियोजनात चूक होऊ शकते.

तुळ - व्यवसाय-धंद्यात इलू लाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल व्यवसायात काही नवीन बदल व्यवसायास पोषक ठरतील काही नवीन ओळखी होतील मात्र महत्त्वाची कामे लक्ष देऊन करा.

वृश्चिक - आर्थिक आवक चांगली राहील मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल अडचणी दूर होतील मात्र काही वेळा कामातील दगदग जाणवेल खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

धनु - नोकरी व्यवसाय धंदा चांगली परिस्थिती राहील जुनी येणी वसूल होतील मात्र महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात कामासाठी धावपळ करावी लागेल मनस्ताप सहन करावा लागेल.

मकर - आपल्या कार्यक्षेत्रात वादविवादाचे प्रसंग येतील मात्र आपली बाजू वरचढ राहील त्याचा गैरफायदा घेऊ नका अधिकारात वाढ होईल पण आपल्या जबाबदारीची जाण ठेवा.

कुंभ - आर्थिक आवक मनाप्रमाणे राहील धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे विविध मार्गांनी पैसे मिळतील धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्यावे.

मीन - जवळचे प्रवास घडतील. व्यवसाय धंदा मध्ये काही वेळेस अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते थोडे दडपण राहील नोकरीत मात्र अनुकूल परिस्थिती.

logo
marathi.freepressjournal.in