आजचे राशिभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 23, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आपल्या कार्यक्षेत्रात आपणास आला जास्त काम पडणारा हे जास्त दगदग होणार आहे. यामुळे आपल्याला थोडेसे थकल्यासारखे वाटण्याचीशक्यता आहे. कुटुंबाला फारसा वेळ देता येणार नाही.

वृषभ - शुभ ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. बेकार व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामात यश लाभेल, बँकेची कामे करून घ्या. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या.

मिथुन - स्वतःच्या हिंडणे फिरणे यावर नियंत्रण ठेवा. तसेच खाणेपिणे यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कोणाशी विनाकारण वादावादी घालू नका.

कर्क - पती-पत्नीमध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. दोघांनी जोड्या समजुतीने घ्यावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये काही कारणास्तव मानसिक ताण येण्याची शक्यता आहे.

सिंह - आपल्याला ग्रहमान अनुकूल आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पण पूर्ण करू शकता. नोकरी-व्यवसायात उत्तम प्रकारचे यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे.

कन्या - नोकरीमध्ये बारीक-सारीक कटकटी पासून सावध राहणे. साहित्यिकांचे लेखन प्रभावी होईल, कल्पनाशक्तीला चांगलाच वाव मिळणार आहे. संतती कडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तुळ - आजचा दिवस आपणास फायद्याचा जाणार आहे. नवीन संधी मिळणार आहे त्यामुळे कामाला सुरुवातच करा, कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका.

वृश्चिक - आपल्याला नोकरीसाठी किंवा व्यापार व्यवसायासाठी बाहेर प्रवास करावा लागणार आहे. खर्च ही त्याच प्रमाणे करावा लागणार आहे. पण उत्पन्नही मिळेल.

धनु - खूप दिवसांनी आपले महत्वाचे काम होणार आहे आहे त्यामुळे आपण पूर्ण निश्वास टाकालं. आळस सोडून कामाला लागण्याचा दिवस आहे. कामाला गती मिळणार आहे.

मकर - कोणत्याही प्रसंगाला समोर जाण्यासाठी आपण पण पूर्णपणे तयार आहात. व्यापार-व्यवसायात नवीन संधीचा फायदा घ्याल, त्यामध्ये चांगले यश मिळेल.

कुंभ - व्यापार व्यवसाय त्यात थोडेफार नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, आक्रमक होऊ नका, अन्यथा चुकीचे निर्णय होऊ शकतात.

मीन - आपल्यामध्ये आज एक प्रकारची ऊर्जा आणि उत्साह असणार आहे. कार्यक्षेत्रात आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याला आपण आपल्या कौशल्याने सोडवणार आहात.

logo
marathi.freepressjournal.in