मेष : आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल मानसिक प्रसन्नता लाभेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. अपेक्षित गाठीभेटी होतील.
वृषभ : कार्यक्षेत्रात तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो. स्थावर- जमिनी विषयी ची कामे गतीमान होतील.
मिथुन : परिवारातून आनंददायक वाढता मिळतील. कुटुंबात एखादे धार्मिक अनुष्ठान घडू शकेल नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील त्यांचे सहकार्य लाभेल.
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. शांतचित्ताने देणे घ्या वादविवाद टाळा. कौटुंबिक सुख मिळेल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील.
सिंह : एखादे काम अर्धवट राहू शकते परंतु ते पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत मिळेल आर्थिक बाब चांगली राहील. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी करू शकाल.
कन्या : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्यता आहे. कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता असल्यामुळे शांत राहणे गरजेचे आहे.
तुळ : आपल्या बोलण्याने अथवा वागण्याने आपण इतरांची मने जिंकू शकाल तुमचा इतरांवर प्रभाव राहील जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो नवीन गुंतवणूकीस दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक : हातात घेतलेली दैनंदिन कामे यशस्वी होतील. कार्यात गतिशीलता असेल कार्यमग्न राहाल मात्र इतरांवर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपवू नका.
धनु : आपल्या अवतीभवती मनस्ताप दायक घटना घडण्याची शक्यता आहे जाणीवपूर्वक लहान मोठ्या गोष्टीमुळे होणारे वादविवाद टाळावेत कामाचा ताण जाणवेल.
मकर : जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे वेळ कसा जाईल हे समजणार नाही जुन्या आठवणीत रमून जाल मित्रमंडळीं समावेत एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकाल वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ : काही अनावश्यक गोष्टीत तुमचा वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण आवश्यक. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे.
मीन : कुटुंबामध्ये जास्ती वेळ द्यायला घरातील मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल घरगुती समस्या सोडवण्यात पुढाकार घ्याल अर्धवट राहिलेले एखादे काम पूर्ण करू शकाल.