मेष - आजच्या दिवसात उत्तम लाभ मिळतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहून अपेक्षित संधी मिळतील कुटुंब परिवारात मोठ्या सुवार्ता मिळतील काहींना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते.
वृषभ - कौटुंबिक सौख्य मिळेल नवपरिणीत जोडपे जीवनात मार्गस्थ होतील काहींना मोठे सांपत्तिक लाभ मिळू शकतात घरात मंगल कार्य ठरेल.
मिथुन - नवीन ओळखी पासून लाभ मिळतील .व्यवसाय धंदा तीन परिस्थिती समाधानकारक राहील नवीन संधी मिळू शकतात काहींना अध्यात्मिक प्रचिती येण्याची शक्यता. प्रेमात यश.
कर्क - कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील आरोग्य चांगले राहील विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवून शिक्षणाचे मार्ग खुले होतील मात्र कुसंगत टाळणे हितकारक ठरेल.
सिंह - बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यास यश मिळेल कुटुंब परिवारात मोठ्या सुवार्ता मिळतील पती वा पत्नी चिंता जाईल मानसन्मानाचे योग.
कन्या - घरातील महत्त्वाच्या व्यक्तींचा उत्कर्ष होऊन घरात आनंदी वातावरण राहील. तरुण-तरुणींचे शिक्षण विषयक तसेच नोकरी आणि विवाह विषयक प्रश्न संपुष्टात येतील.
तुळ - आजच्या दिवसात काही गतिमान घटना घडतील घरा विषयी केलेले प्रयत्न फल होऊन राहत्या घराचा प्रश्न मिटेल अचानक धनलाभ होऊ शकतो आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहता येईल.
वृश्चिक - जीवनसाथी साथ मिळेल लहान-मोठ्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते कुटुंब परिवारातील मुलींकडून सुवार्ता मिळतील. व्यवसाय धंद्यात प्रगती करू शकाल.
धनु - एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल उत्साह वाढेल आपल्या समोरील कामे आपण गतीने कराल काही व्यक्तींना परदेशगमनाचे योग आहेत आरोग्य सांभाळा.
मकर - आपल्या कार्यक्षेत्रातून मोठे भाग्यदय नवीन करार मदार होण्याची शक्यता व्यवसायिक नवे अनुबंध जुळतील नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
कुंभ - बरेच दिवस मनात ग्रासलेली एखादी गुप्त चिंता जाईल. अनुकूल घटना घडून उत्साह वाढेल. व्यावसायिक आर्थिक गरज पूर्ण होईल मित्रमंडळींच्या समवेत मजे मध्ये दिवस जाईल.
मीन - अचानक धनलाभाचे योग रखडलेली मालमत्ता व जमिनी विषयक कामे होतील महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील ओळखी मध्यस्ती यशस्वी ठरतील.