आजचे राशिभविष्य, २४ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 24, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, २४ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - आज आपली कामे दुपारपर्यंत करून घ्या. मुख्य म्हणजे आर्थिक कामे केल्यास आर्थिक प्राप्ती होईल उधारी वसूल होण्याचा दिवस आहे. तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळेल.

वृषभ - आज आपले देव आपल्या बाजूने आहे लक्षात ठेव महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या नवे करार नवे संकल्प आपल्या मनासारख्या होतील. सर्व कामांमध्ये आपणास सहकारी व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.

मिथुन - सरकारी कामांना प्राधान्य द्या. आपल्या बुद्धीच्या आर्थर यांनी कामे चांगली होतील. वरिष्ठ वर्गांशी चांगले संबंध ठेवा. आपल्या अधिकारांचा योग्य वापर केल्याने मान सन्मानात वाढ होईल.

कर्क - आपल्या कामांमध्ये प्रगती होणार आहे. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध येणार आहे त्यांचे आपणास सहकार्य लाभणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचा दिवस आहे. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हाल.

सिंह - आज आपण थोडे आक्रमक असाल. काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मानसिकता सांभाळा. वादविवादाची शक्यता. त्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात जास्त काम करावे लागणार आहे. काम फक्त नियमित करणे आवश्यक आहे. कौटुंबिक आयुष्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योगांमध्येही फार धक्का पत्करू नका.

तुळ - आजचा दिवस तुम्हाला फारसा अनुकूल नाही. नोकरीमध्ये ताण असण्याची शक्यता आहे. काम नियोजनपूर्वक करा ताण कमी होईल. सहकारी व्यक्तींशी गोड बोलून सहकार्य मिळवा.

वृश्चिक - तुमच्या मित्रांची संख्या वाढणार आहे. अचानक होणारा प्रवास तुम्हाला फलदायी ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी अनुकूल असणार आहे. नातेवाईकांचे सहकार्य मिळणार आहे.

धनु - आपल्या आजूबाजूचे वातावरण अतिशय चांगले असणार आहे. आपल्या समस्या आपोआप सोडवल्या जातील. आपल्या घरातील व्यवहार चालू राहणार आहे सन्माननीय व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.

मकर - शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. मानसिक तणावही आपला कमी होणार आहे. कुटुंबत आपली प्रतिमा चांगली राहणार आहे.

कुंभ - आजचा दिवस आपणास अत्यंत उत्पादनक्षम असणार आहे. आपले जे ध्येय गाठायचे आहे त्यामध्ये आपणास समाधान मिळणार आहे. आजचा दिवस पूर्णपणे सकारात्मकतेने आणि चैतन्याने भरलेला असेल.

मीन - आज आपणास संपूर्ण दिवस मिश्र स्वरूपाचा जाणार आहे. दुपारपर्यंत असलेली मरगळ नंतर अचानक दूर होऊन आपण आनंदी होणार आहात. दुपारनंतर महत्त्वाच्या कामांना वेग येणार आहे आर्थिक फायदा होईल.

logo
marathi.freepressjournal.in