आजचे राशिभविष्य, २५ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 25, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, २५ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - आजचा दिवस फारसा आपणास अनुकूल नाही. आपण आपल्या जीवनाकडे फार सकारात्मक दृष्टीने बघणार नाही. आजचा दिवस विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे समोर जावे लागणार आहे.

वृषभ - आजचा दिवस आपणास आनंदाचा आहे मैत्रीचे संबंध वाढणार आहेत अनेकांना आपला सहवास हवाहवासा वाटणार आहे. वाक चातुर्याने आपण आपली कार्यसिद्धी करून घेणार आहात.

मिथुन - आपला स्वभाव जुळून घेण्याचा आहे. समोरच्याकडून आपल्याला काय फायदा आहे याचे आकलन निश्चितच चांगले होते. त्यामुळे स्पर्धा आणि अडथळे यातून चांगला मार्ग काढणार आहात.

कर्क - आपली निर्णय घेण्याची क्षमता आणि तारतम भाव जाणण्याची क्षमता अतिशय उत्तम आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात उत्तम निर्णय होणार आहेत. त्याचे फायदे आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या दोन्ही प्रकारे होणार आहेत.

सिंह - आज आपल्याला आपला आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटणार आहे पण सकारात्मक विचार आणि कामात व्यग्र ठेवणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात छोटे मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ते लाभकारक आहेत. भागीदाराच्या व्यवसायात आपणास चांगला फायदा होणार आहे.भागीदाराची मदत आपल्याला चांगल्या प्रकारे होईल.

तुळ - व्यवसायासाठी आपणास कर्ज हवे असल्यास ते आपणास मिळू शकते. आज आपणाला जास्त काम असणार आहे. हाताखालील व्यक्तींची मदत घ्यावी लागणार आहे. नोकरीमध्ये उत्तम कालावधी आहे.

वृश्चिक - वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. संतती कडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. लेखक कवी यांच्या लिखाणाची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल. प्रतिष्ठा मिळेल.

धनु - कुटुंबामध्ये एकोपा राहील याची आपण काळजी घेणार आहात.आपल्याकडे सकारात्मक विचार असल्याने कामांमध्ये प्रगती होणार आहे. घरातील महत्त्वाच्या व वस्तूंची खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे.

मकर - नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्याचे प्रयत्न करा. आपला व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टिकोनातून चांगले संदेश मिळणार आहेत. त्यादृष्टीने कामाचे नियोजन चांगल्या प्रकारे कराल. प्रवासाची शक्यता.

कुंभ - आपले महत्वाचे कार्य आज सहजरीत्या होणार आहे. घरातील वातावरणही आनंदी असणार आहे. घरातल्यांचे सहकार्य मिळणार आहे. आर्थिक बाबतीत आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे.

मीन - दीर्घकालीन योजना तूर्तास थांबून ठेवा. आपल्याकडे जे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत त्यातूनच उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळणे चांगले. दुसऱ्या वर जास्त विश्वास ठेवू नका.

logo
marathi.freepressjournal.in