मेष : आज आपणास प्रिय व्यक्ती भेटतील. त्यामुळे आपण आनंदी व्हाल. इतरांच्या टीकेमुळे अजिबात दुखी होऊ नका. आपण आपल्या कामाचे नियोजन केले आहे त्याप्रमाणे उद्दिष्ट गाठाल.
वृषभ : तुमचा आज धावपळीचा दिवस असला तरी, तुमची ऊर्जा टिकून राहणार आहे. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणी वर मात करणे सहज शक्य आहे.
मिथुन : आजचा दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी केलेले कामाचे आयोजन आपणास यशस्वी ते कडे नेणार आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत जवळच्या नातेवाईकांकडे भेट देण्याची शक्यता आहे .
कर्क : नवीन आर्थिक करांराना चांगले स्वरूप मिळणार आहे. नवीन अर्थपुरवठा होणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईक यांच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल.
सिंह : आपल्या जीवनसाथी आपल्याला चांगली साथ राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही मोहात अडकून नका.
कन्या : नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक आवक उत्तम राहिल. खरेदी होईल .आज कामाचा ताण राहणार आहे. जास्त कामाने थकवा जाणवणार आहे.
तुळ : बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. मुलांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्याकडे व्यक्तिशः लक्ष देणे आवश्यक आहे.नवा मार्ग व नवी दिशा सापडणार आहे.
वृश्चिक : आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रॉपर्टी गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम असणार आहे. आपणास अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनु : नोकरी व्यवसायातील आजचा दिवस यशस्वी असणार आहे.आजचे काम भरपूर असणार आहे. आपणास सहकार्य मिळाल्यामुळे ताण कमी होणार आहे.
मकर : मन प्रसन्न असणार आहे. मनासारख्या घटना घडणार आहेत. आर्थिक आवक चांगली असेल. खरेदी उत्तम होईल. महिलांची खरेदी मनाप्रमाणे होईल. खर्च मोठ्या प्रमाणात होईल.
कुंभ : तुमच्या आकर्षक मनमोहक वागण्यामुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही आर्थिक प्राप्ती करण्यास सक्षम असणार आहात. तुमची दिनचर्या चांगली असणार आहे.
मीन : एखाद्या उच्च व्यक्तिमत्व अशा व्यक्तीला भेटताना उदास होऊ नका, किंवा आपला आत्मविश्वास हरवून देऊ नका. दिवस खूप व्यस्त जाणार आहे.