आजचे राशिभविष्य, २५ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 25, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आज आपणास प्रिय व्यक्ती भेटतील. त्यामुळे आपण आनंदी व्हाल. इतरांच्या टीकेमुळे अजिबात दुखी होऊ नका. आरोग्य चांगले असणार आहे.

वृषभ - तुमचा आज धावपळीचा दिवस असला तरी, तुमची ऊर्जा टिकून राहणार आहे. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणी वर मात करणे सहज शक्य आहे.

मिथुन - आजच्या दिवशी केलेले कामाचे आयोजन आपणास यशस्वी ते कडे नेणार आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत जवळच्या नातेवाईकांकडे भेट देण्यात जाण्याची शक्यता आहे .

कर्क - नवीन आर्थिक करांराना चांगले स्वरूप मिळणार आहे. नवीन अर्थपुरवठा होणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईक यांच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल.

सिंह - आपल्या जीवनसाथी आपल्याला चांगली साथ राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पोटाचा त्रास संभवतो.

कन्या - नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक आवक उत्तम राहिल. खरेदी होईल .आज कामाचा ताण राहणार आहे. जास्त कामाने थकवा जाणवणार आहे.

तुळ - बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. मुलांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्याकडे व्यक्तिशः लक्ष देणे आवश्यक आहे. नवा मार्ग व नवी दिशा सापडणार आहे.

वृश्चिक - आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रॉपर्टी गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम असणार आहे. आपणास अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु - नोकरी व्यवसायातील आजचा दिवस यशस्वी असणार आहे. आजचे काम भरपूर असणार आहे. आपणास सहकार्य मिळाल्यामुळे ताण कमी होणार आहे.

मकर - मन प्रसन्न असणार आहे. मनासारख्या घटना घडणार आहेत. आर्थिक आवक चांगली असेल. खरेदी उत्तम होईल. महिलांची खरेदी मनाप्रमाणे होईल.

कुंभ - तुमच्या आकर्षक मनमोहक वागण्यामुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही आर्थिक प्राप्ती करण्यास सक्षम असणार आहात. तुमची दिनचर्या चांगली असणार आहे.

मीन - एखाद्या उच्च व्यक्तिमत्व अशा व्यक्तीला भेटताना उदास होऊ नका, किंवा आपला आत्मविश्वास हरवून देऊ नका. दिवस खूप व्यस्त जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in