मेष : एकूणच अडचणी दूर झाल्यामुळे आनंद आणि उत्साह यामध्ये वाढ होईल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. यशाचे प्रमाण वाढते राहिल. नोकरी चांगली परिस्थिती राहील.
वृषभ : भावनेच्या भरात येऊन तडकाफडकी निर्णय घेऊ नका. नुकसानीस आमंत्रण ठरेल. महत्त्वाची कामे मात्र पूर्ण होतील. शांतपणे आणि संयमाने आपले पुढील निर्णय घ्या.
मिथुन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विविध मार्गांनी धन प्राप्ती होऊ शकते. व्यवसाय धंद्यात उधारी वसूल होईल. एखादी चांगली संधी चालून येईल. त्यामध्ये तुमचा फायदा असेल.
कर्क : कुटुंब परिवारातून सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय धंद्यात भरभराटीची शक्यता. आपण काही धाडसी निर्णय घेतल्याने व्यवसायात फायदा होईल. नोकरीत बदली होऊ शकते.
सिंह : धाग्याची चांगली साथ राहिल्यामुळे अनुकूलतेमुळे वाढ दिसेल. काही कामासाठी अचानक प्रवास करावा लागण्याची शक्यता. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल.
कन्या : आर्थिक आवक चांगली राहील. अचानक याची शक्यता आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र कामाची व्याप्ती वाढल्यामुळे दगदग होईल. कुटुंब परिवारात मधुर भाषिक व्हा.
तुळ : भागीदारीच्या व्यवसायात भागीदारी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. त्याचे म्हणजे नीट समजावून घेणे गरजेचे ठरेल. तसेच लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे राहील.
वृश्चिक : आर्थिक आवक सर्वसामान्य राहिल. मित्रमंडळींच्या समावेत मौजमजेत दिवस जाईल. मात्र व्यसनांपासून दूर राहा. कुटुंब परिवारात उत्साही वातावरण राहील. खर्चाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल.
धनु : कौटुंबिक सौख्य मिळून संततीच्या यशाच्या वार्ता कानी आल्यामुळे कुटुंब परिवारामध्ये आनंद द्विगुणित होईल. नोकरी मधील आपल्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक भरभराट होईल.
मकर : नोकरीत अनुकूलता लाभेल मात्र काहींना अचानक बदलेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कामाच्या स्वरूपात बदल होईल, तसेच स्थान बदली होऊ शकतो.
कुंभ : काही अनुकूल घटना घडल्यामुळे आनंद दिवस जाईल. आत्मविश्वासात वाढ होईल, मात्र उत्साहाच्या भरात घरातील बाबींकडे दुर्लक्ष करू नका समन्वय ठेवा.
मीन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता. पूर्वी दिलेली येणे अचानक वसूल झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. वडिलोपार्जित संपत्ती संबंधी सकारात्मक हालचाली होतील. बोलणी सफल ठरतील.