मेष - जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग प्रयत्न केले तर कामे पूर्ण करू शकाल आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसाय धंद्यात प्रगती कारक घटना घडू शकतात एखादी चांगली बातमी कळेल.
वृषभ आत्तापर्यंत रखडलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करावे दैनंदिन कामे सहजासहजी होतील भाग्याची चांगली साथ राहील जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल.
मिथुन - आपल्या कार्यक्षेत्रात अथवा कुटुंब परिवारात इतरांशी वाद-विवाद घडण्याची शक्यता आहे ते टाळणे हिताचे ठरेल गृहसौख्य चांगले राहील प्रवास घडतील.
कर्क - महत्त्वाच्या कामात यश मिळेल सोप्या पद्धतीने कामे होतील जोडीदार आपली मते मान्य करेल मित्रमंडळींच्या वर्तुळातून वाद-विवाद घडतील प्रवास होण्याची शक्यता प्रवासात सावधान राहा.
सिंह - मन प्रसन्न राहील आत्मविश्वास वाढेल उत्साहात वाढ होईल नवीन कल्पना सुचतील प्रलंबित कामांना गती द्याल जोडीदाराशी मधुर संबंध राहतील धनप्राप्ती होऊ शकते.
कन्या - वाहन सांभाळून चालवा वेगावर मर्यादा आवश्यक जीवनसाथी सूर जुळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
तुळ - अनुकूल दिवस आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे महत्त्वाच्या गाठीभेटी होऊ शकतात घरातील वातावरण प्रसन्न राहील नवीन नवीन संधी व्यवसाय-धंद्यात मिळू शकतो.
वृश्चिक सामाजिक कार्यात रस वाटेल एखाद्या समारंभाला उपस्थित रहाल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे इतरांचा अपमान करू नका.
धनु - काहींना अचानक धनप्राप्ती होईल काही लाभ होतील जमीन जुमला तील महत्त्वाची कामे मार्गी लागतील कौटुंबिक समस्यांवर ती जास्त विचार करू नका जीवनसाथी बरोबर वादविवाद टाळा.
मकर - सहकुटुंब सहपरिवार पर्यटन अथवा देवदर्शन या निमित्ताने प्रवास होऊ शकतो प्रवासात मन आनंदी राहील अनेक चांगल्या घटना घडतील आर्थिक बाजू चांगली राहील.
कुंभ - आपल्या रागला आवर घाला रंगाचा बेरंग टाळा महत्त्वाची कामे विलंबाने पूर्ण होण्याची शक्यता खर्च वाढतील आरोग्याची काळजी घ्या वाहन जपून चालवा कायद्याची बंधने अवश्य पाळा.
मीन - तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल कुटुंब परिवार जोडीदाराशी मधुर संबंध राहतील आर्थिक आवक चांगली राहील मुलांच्या प्रगती पर बातम्या कानावर पडल्यामुळे वातावरण आनंदी राहील.