आजचे राशिभविष्य, २६ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 26, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, २६ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - कुटुंबातील सदस्यच्या आरोग्याच्या तक्रारी मुळे चिंताग्रस्त राहणार आहात.अनावश्यक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात आपण काळजी घेतलेली चांगली. मित्र आणि सहकारी वर्गाशी चांगले वागा.

वृषभ - आपली काम करण्याची क्षमता चांगलीच आहे. मात्र आज आपल्यामध्ये उत्साह आणि चैतन्य असणार आहे. आपण पूर्णपणे आपल्या कार्यक्षमतेवर काम करणार आहात.अपेक्षेपेक्षा चांगले काम होणार आहे.

मिथुन - आज आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी भरपूर कालावधी मिळणार आहे. आपणास धावपळ करावी लागणार आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आपल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती कराल.

कर्क - आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या संधी येणार आहे. त्याचा आपण चांगला उपयोग करून घेणार आहात. चांगल्या लोकांचे सहकार्य मिळणार आहे.

सिंह - आजचा दिवस आपला संमिश्र घटनांचा असणार आहे. आपणास मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही अडचण येण्याची शक्यता आहे.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या बाकी दरांमुळे आपल्याला अडचणी अडथळे येण्याची शक्यता आहे त्यांच्यावर अवलंबून न राहता,स्वतः व्यवसायात लक्ष घाला. आर्थिक नुकसान टळेल.

तुळ - आज आपणाला विपरीत परिस्थितीत काम करावे लागणार आहे. मानसिक अवस्था चांगली ठेवा. विनाकारण वाद विवाद होऊ शकतात. शत्रु विनाकारण त्रास देण्याची शक्यता आहे. त्यांना योग्य उत्तर द्या.

वृश्चिक -आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगली भरारी मारणार आहात.आपल्या कार्यक्षमतेने मुळे प्रगती होणार आहे. आपल्या हातून चांगली कामे होणार आहेत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

धनु - आज आपले मन शांत व स्थिर असणार आहे. कामे सहज व सुरळीत होतील. आपल्या मालमत्तेवर विषयी काही कामे असल्यास ती पुढे सरकतील. घरातील ज्येष्ठ मंडळींचे आपल्याला सहकार्य असणार आहे.

मकर - विपरीत परिस्थिती सुद्धा चांगल्या प्रकारे आपण काम हाताळू शकाल. असे आपले ग्रहमान आहे. आपल्या भावंडांचे आपले मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या थोड्याफार कुरबुरी असू शकतात.

कुंभ - आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. हातून सत्कार्य होणार आहे. कौटुंबिक सौख्य चांगल्याप्रकारे मिळणार आहे. स्वतःच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे.

मीन - आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपले मूल्य पडणार आहे.तुमच्या छंदासाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in