आजचे राशिभविष्य, २६ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 26, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - दिवस उत्साहपूर्ण राहील. अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात जुनी येणे वसूल होतील. मनासारखी खरेदी करता येईल.

वृषभ - आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान देणाऱ्या घटना घटित होतील. प्रवासाची शक्यता. व्यवसायामध्ये समाधानकारक परिस्थिती राहील.

मिथुन - महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी. जवळचे तसेच दूरचे प्रवास टाळावेत. कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

कर्क - समाजातील मान्यवरांच्या ओळखी होतील. नवीन परिचय होतील नवे अनुबंध जुळतील. लोकसंग्रह वाढेल. गुरुकृपा होईल.

सिंह - सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय भाग घ्याल मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. समाधान लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती असेल.

कन्या - सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींच्या सामावेश एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभून एखादी महत्त्वाची वार्ता मिळेल.

तुळ - एकाच वेळेस अनेक विचार मनामध्ये राहतील त्यामुळे गोंधळाची शक्यता निर्माण होऊ शकते वाहने जपून चालवावीत वाहतुकीच्या नियमांचे पालन अवश्य करा.

वृश्चिक - इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यावर मत प्रदर्शित करणे हितकारक ठरेल. इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या. कामे मार्गी लागतील.

धनु - व्यवसाय धंद्यामध्ये कामगारांचे व भागीदाराचे सहकार्य लाभेल व्यवसायिक प्रश्न मिटतील. नोकरीत सहकाऱ्यांचे वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

मकर - कुटुंब परिवारातील मुला मुलींचे प्रश्न सुटतील महत्त्वाचे पत्रव्यवहार अपेक्षा पूर्ण करू शकतील. कौटुंबिक सुख मिळेल जीवन साथी चे सहकार्य विशेषतः लाभेल.

कुंभ - जमीन, स्थायी संपत्ती याविषयीचे थंडावले ले व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. मध्यस्थी यशस्वी होतील.नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन - हाती घेतलेले कार्य जिद्दीने पूर्ण करण्याची इच्छा असेल. इतरांना आपले मार्गदर्शन मिळेल. हीच शत्रूंवर मात कराल.धनलाभ होईल.

logo
marathi.freepressjournal.in