आजचे राशिभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 26, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आर्थिक बाबीसाठी आजचा दिवस आपला चांगला फलदायी असणार आहे. आपण जर व्यवसाय का साल तर व्यवसाय वाढीसाठी आपले प्रयत्न चांगले असणार आहेत.

वृषभ - आज आपण प्रसन्न असणारा आहात. कामाची सुरुवात आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. व्यापार व्यवसायात आपणास चांगला मोबदला मिळणार आहे.

मिथुन - आज आपली प्रकृती नाजूक असल्यामुळे, शारीरिक थकवा येणारी कामं करू नका. महत्त्वाची कामे खूप विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.

कर्क - आपल्या नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी आपल्या साठी लाभकारी असणार आहेत. प्रेमी-प्रेमिकासाठी आजचा दिवस आपणास अनुकूल राहणार आहे.

सिंह - आपण जर संधीचा फायदा घेतला तर आपला फायदा होणार आहे. आपल्या कल्पक दृष्टिकोनाने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वाढ होणार आहे.

कन्या - तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांचे साहाय्य होणार आहे. मित्र ओळखीच्या व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरणार आहेत.

तुळ - आपल्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करण्याची गरज आहे. तरच आपणाला यश मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या थोडा कठीण कालावधी आहे.

वृश्चिक - पुढच्या कारकिर्दीसाठी आपले प्रयत्न सांगली होणार आहेत. कार्यक्षेत्रात मोठ्याची येण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होणार आहे मात्र आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

धनु - कामामध्ये व आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे.

मकर - लॉटरी, सट्टा, जुगार यापासून लांब राहणे आपल्या हिताचे आहे. आपले प्रयत्न यशस्वी होणार आहे. आर्थिक बाजू चांगली सांभाळली जाईल. संततीचे प्रश्न सुटतील.

कुंभ -आपल्या कुटुंबीयांची अधिक सखोल नाते निर्माण होणार आहे. घरातील जमीनजुमल्याच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागणार आहे.

मीन - नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे जीवन सकारात्मक राहणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात अत्यंत अनुकूल पणे होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in