आजचे राशिभविष्य, २६ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 26, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, २६ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष - आरोग्य चांगले राहून कुटुंबातील वातावरण आनंदी राहील मुलांच्या यशाच्या वाढता कानावर पडतील घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो पाहुणे येतील.

वृषभ - महत्त्वाच्या कामात अनपेक्षित आणि घवघवीत यश मिळेल त्यामुळे प्रसन्नता लाभेल घरात आनंदी वातावरण राहील खाणेपिणे मनासारखे मिळेल अचानक धनलाभ होऊ शकतो.

मिथुन - आयत्या वेळेस नियोजनात बदल करावा लागेल गृहसौख्य वाढ होईल घरातील सदस्यांची आपला समन्वय चांगला राहील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

कर्क - व्यवसाय नोकरीतील आपले अंदाज अचूक ठरतील काहींना अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो हितशत्रू आपल्याला त्रस्त करू शकतात व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.

सिंह - महत्वाची कामे होतील समाजातील मान्यवरांच्या भेटी होतील कामे जरी वाढली तरी आपण अतिशय कौशल्याने कामे पूर्ण कराल.आपले महत्त्व वाढेल. प्रवासाची शक्यता.

कन्या - कुटुंबात चांगले वातावरण राहील आनंदवार्ता समजतील मात्र जीवनसाथीची थोडा वाद होण्याची शक्यता आहे तब्येतीची काळजी घ्या खाणेपिणे मनासारखे मिळेल.

तुळ - मित्रमंडळींबरोबर तसेच सहकुटुंब सहपरिवार आपण आनंदात वेळ घालवाल. जुने मित्र भेटतील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल.

वृश्चिक - कुटुंबात आपल्या कार्यस्थळी तसेच कार्यक्रमात वाद विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. मानापमानाचे नाट्यरंगून रंगाचा बेरंग होऊ शकतो ते टाळा. शुभवार्ता समजतील.

धनु - हाती घेतलेल्या नवीन कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात शांतपणे निर्णय घेण्याची गरज स्वभावात चिडखोरपणा डोकावेल खर्चामध्ये अनपेक्षित वाढ होईल.

मकर - ठरलेल्या कामात बदल होऊ शकतात घरासाठी खर्च कराल घरातील मुलांची काळजी घ्या तसेच त्यांच्याबरोबर वाद-विवाद टाळा शांतपणे निर्णय घ्या.

कुंभ - प्रवास घडतील परंतु प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा जोडीदाराच्या लहरीपणामुळे आपल्याला मनस्ताप होण्याची शक्यता घरातील मुलांना यश मिळेल.

मीन - सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय योगदान द्याल एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी सहकुटुंब सहपरिवार भेट देण्याचे नियोजन कराल.

logo
marathi.freepressjournal.in