मेष - आपली मानसिकता चांगली असणार आहे. पण घरातील कोणाचीतरी आरोग्याची समस्या उद्भवू शकते. त्या मुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
वृषभ - आपल्या स्वतःला आत्मविश्वास कमी असल्यासारखे वाटणार आहे. एका वेळेला अनेक विचार मनामध्ये येण्याची शक्यता आहे. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.
मिथुन - आपल्या व्यापार व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्यामध्ये कार्य करण्याची क्षमता चांगली असणार आहे. आपल्या हातून चांगले काम झाल्याने आपली प्रशंसा होणार आहे. सहकार्य मिळेल.
कर्क - आज आपली महत्वाच्या कामासाठी खूप धावपळ होणार आहे. काम वाढणार आहे. काम जास्त झाली तरी मानसिक समाधान होईल. मागे पडलेली काम पूर्ण होणार आहेत. वरिष्ठांचे सहकार्य राहणार आहे.
सिंह - कामासाठी जास्त परिश्रम करावे लागणार नाही. कामे सहज आणि चांगली होतील. सामाजिक कार्यांमध्ये प्रतिष्ठा लाभणार आहे. उत्साही आणि आनंदित असणार आहात. धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे.
कन्या - आज आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटणार आहे. एकावेळी अनेक विचार करू नका. हे काम पूर्ण झाल्यावरच दुसरे काम करा. त्यामुळे मनाचा गोंधळ कमी होईल.
तुळ - व्यापार व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. व्यवसायात वाढ होणार आहे. आर्थिक लाभ मनाप्रमाणे मिळतील. भागीदारीतील व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढणार आहे.
वृश्चिक - व्यवसायिक म्हणून काम करत असाल तर आजचा दिवस साधारण जाणार आहे. कामांमध्ये अडथळे जाणवणार आहेत. अपेक्षित वाढ मिळणार नाही. प्रगतीसाठी थांबावे लागणार आहे.
धनु - आजचा दिवस आपल्या बाजूनी असणार आहे. जे काम कराल त्यामध्ये यश येणार आहे. आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळेल. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. संतती विषयी चिंता संपेल.
मकर - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही समस्या किंवा स्वतःच्या आरोग्याचे मुद्दे समोर येतील. त्याचा तुमच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. चांगले निर्णय होतील घरातील लोकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ - आज तुम्ही आपल्या कार्यालयीन कामामुळे व्यस्त असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या संधी मिळणार आहे. आपल्याला हव्या असलेल्या संधी परदेशातून मिळतील. प्रवास यशस्वी होतील.
मीन - आपली आर्थिक कोंडी सुटल्यामुळे आपणास समाधान मिळणार आहे. आपल्याजवळ पुरेसे पैसे असल्यामुळे सर्व देणी देऊन टाकाल. खर्च जरी जास्त झाला तरी पुरेसे उत्पन्न असणार आहे.