मेष - आपल्या कामाचे कौतुक होणार आहे. अधिकाराचा व्यापार योग्य ठिकाणी करा. आपल्या कामात फरक दिसणार आहे. आपली प्रगती होईल. अचानक नवीन घटनांना सामोरे जावे लागणार आहे.
वृषभ - वैवाहिक जीवनात सुसंवाद साधणार आहात. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभणार आहे. नोकरीमध्ये अपेक्षित प्रगती होणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. उमेद वाढणार आहे.
मिथुन - ग्रहणाच्या दृष्टीने अपेक्षित फलप्राप्ती करून घेऊन जा काल उत्साहात भर पडणार आहे काही महत्त्वाच्या कामात यशाचे माप तुमच्या पदरात पडणार आहे.
कर्क - मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. धार्मिक वाचनाने मनःशांती लाभण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. कामाचे नियोजन करून काम केल्यास योग्य रीतीने काम होईल.
सिंह - शासकीय कामे पुढे ढकलणे आपल्या दृष्टी कारणातून हितकारक आहे. हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
कन्या - आज पण आपला दिवस महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी घालवणार आहात. महत्वाच्या कामांसाठी काही संदेश आपल्यासाठी येणार आहेत. आपल्या प्रगतीसाठी ते हितकारक राहणार आहे.
तूळ - मनातील नकारात्मक आता निघून गेल्यामुळे आपण मोकळा श्वास घेणार आहात. शेतीची कामे करायची असल्यास जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कुठलाही निर्णय मनाने घेऊ नयेत.
वृश्चिक -आज आपण आनंदी राहणार आहात. घरांमध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी होतील. आपल्या आवडीचे पदार्थ घरी केले जातील. महत्वाची बातमी कळेल. व्यापार व्यवसायात यश.
धनू - काही कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. नवीन लोकांची संपर्कात येणार आहात. त्यांच्याशी पटवून घ्यावे लागणार आहे. जास्त दगदग आणि धावपळ करू नका.
मकर - चांगल्या गोष्टीची सुरुवात झालेली दिसेल. घरामध्ये नवीन विषय बोलले जातील. नोकरी-व्यवसाय उत्तम स्थिती राहणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभणार आहे.
कुंभ - नोकरी व्यवसायात चांगला जम बसेल. थोडी योजनांमध्ये कल्पकता आणण्याची गरज आहे. जीवन साथी चांगली साथ देणार आहे. आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
मीन - प्रिय व्यक्ती आपल्या सोबतच रहाणार आहे. त्यांच्यासाठी आपला खर्च होणार आहे. काही व्यक्तींची अध्यात्मिक प्रगती होणार आहे. तुमचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाहीये.