आजचे राशिभविष्य, २८ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 28, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळतील महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील मात्र अनपेक्षित खर्च उभे राहतील प्रतिष्ठेचे प्रश्न टाळणे महत्त्वाचे ठरेल.

वृषभ - समाजातील परिचित प्रतिष्ठित लोकांपासून काही लाभ संभवतो हाती घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील धनलाभ होईल आर्थिक व्यवहारात अव्यवहार्य धाडस करणे टाळा.

मिथुन - आर्थिक नियोजन काटेकोरपणे करून अमलात आणा . आपल्याजवळील मौल्यवान वस्तू तसेच वाहने सुरक्षित जागी ठेवा गहाळ होण्याची अथवा चोरीची शक्यता.

कर्क - नोकरी व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल. कामकाजात अपेक्षित प्रगती होण्यासाठी कामात अचूकता व सातत्य महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा.

सिंह - आपली मते इतरांवर लादू नका होणारे वाद विवाद टाळा कुठल्याही अव्यवहार्य मार्गाचा अवलंब करू नका काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

कन्या - कुटुंब परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात गैरसमज होऊ शकतात आत्मपरीक्षण करून चुका टाळता येतील कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.

तुळ - मैत्रीत व्यवहार किंवा व्यवहारात मैत्री यापासून अलिप्त राहा भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला प्राधान्य द्या अनुकूल घटना घडून मन सुखावेल कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्चिक - लहान सहान कारणांवरून होणारे वाद विवाद जाणीवपूर्वक दुर्लक्षित करा आपल्या कार्यात एकाग्रता साधणे आवश्यक राहील गुप्त शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवा.

धनु - व्यवसायिक नवीन योजना व नियोजन प्रत्यक्षात साकार होण्यास योग्य काळ आहे आर्थिक लावणी उत्सव वाढेल आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल नवीन कामांची आखणी कराल.

मकर - नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरू शकतो. आर्थिक स्थितीचा अंदाज समोरच्या व्यक्तीला येणार नाही याची दक्षता घ्या. चुकांचे विरोधक भांडवल करू शकतात.

कुंभ - आपल्या कृतीने अथवा बोलल्या वागण्याने शत्रूंचा संकेत वाढ होणार नाही याची दक्षता घ्या कुटुंबातील काही जणांच्या कृतीमुळे मनस्ताप होण्याची शक्यता.

मीन - आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी स्वीकारा समोरच्या प्रस्तावावर विचार करून निर्णय घ्या शारीरिक अस्वास्थामुळे कामकाजाचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in