आजचे राशिभविष्य, २८ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 28, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य, २८ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
Published on

मेष : समाजामध्ये आपले वर्चस्व वाढणार आहे. अवघड कामे सुद्धा सहज रित्या पूर्ण करण्याची मानसिकता आपल्या मध्ये असणार आहे. पेंडिंग कामे पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. माझा पण उत्साही असणार आहात.

वृषभ : आपल्यावर कामाचा ताण असणार आहे. थोड्या प्रकृतीच्या कुरबुरी असल्यामुळे चिडचिड होऊ शकते. आपल्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय आज होऊ नका.

मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. आपण आपल्या बुद्धी चातुर्याने व कौशल्याने कोणत्याही प्रकारच्या कठीण समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकाल. कार्यक्षेत्रात व कुटुंबात चांगले निर्णय घ्याल.

कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे. ज्या व्यक्ती सरकारी नोकरी करतात त्यांना आजचा दिवस अतिशय चांगला आहे. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करा.

सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन योजना आपण अमलात आणण्याचा प्रयत्न करत होता त्या योजना आता कार्यरत होतील. त्यातून सामाजिक आणि आर्थिक फायदा होणार आहे. प्रवास होण्याची शक्यता.

कन्या : आज आपल्या मध्ये मनोबल फार कमी असणार आहे. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळा. व्यापार व्यवसायामध्ये हवे तसे परिणाम मिळणार नाहीत. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे

तुळ : आपल्या व्यापार-व्यवसायात नवीन योजना अमलात आणू शकता. त्यातून आपल्याला चांगले फायदे मिळू शकतात. आपला जबाबदारीचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये चांगली वृद्धी होईल.

वृश्चिक : आपल्या जीवनसाथी व बरोबर छोट्या कारणांनी वाद-विवाद होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला आहे. आपल्याला सहकारी व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.

धनु : विद्यार्थी वर्गाला काही नवीन करण्याची प्रेरणा मिळणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना तसेच लेखकांना चांगली संधी मिळणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये नवीन नवीन योजना कार्यान्वित कराल.

मकर : आपण आपल्या कार्यक्षेत्रात किंवा खाजगी आयुष्यात प्रत्येक गोष्टी मध्ये सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणी आपल्या पद प्रतिष्ठेला बाधा आणत नाही ना याची काळजी घ्या. घरातून चांगले सहकार्य मिळणार आहे.

कुंभ : ज्या जातकांचा व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, त्यांना विदेशांमधून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये आता पेक्षा चांगली सुधारणा होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करू नका.

मीन : आपल्याला उत्पन्नाचे नवे साधन मिळू शकते. आर्थिक येणी येणार असतील तर ती येतील. कुटुंबीयांसाठी काही खर्च करणार आहात. जास्त खर्च झाला तरी पण त्याच प्रमाणात आपल्याला राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in