आजचे राशिभविष्य, २८ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 28, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - एका वेळेस एकच काम करा. अनावश्यक भटकंती होण्याची शक्यता वेळेचा अपव्यय टाळू शकता. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींबरोबर केलेली चर्चा व त्यांचा सल्ला उपयोगी पडेल.

वृषभ - आपल्या बोलण्यामध्ये आज स्पष्टता हवी. समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आपली मते स्पष्टपणे व निर्भीडपणे मांडा. त्याचा आपल्याला फायदा होईल.

मिथुन - नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी यांच्यापैकी कोणाला तरी आपल्या मदतीची गरज भासू शकते पण ती मदत आपण कराल तसेच घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.

कर्क - भागीदारीच्या व्यवसायासाठी चांगला दिवस स्वतःच्या व्यवसायात नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून व्यवसायाच्या पद्धतीत बदल कराल भागीदाराची मते पटतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

सिंह - आज दिवसभरात आपल्या अवतीभोवती गतिमान घटना घडू शकतात आपल्या विचारांना गती प्राप्त होईल नवनवीन कल्पना सुचतील आपल्या हातून एखादे भरीव कार्य घडेल.

कन्या - एखादी अनामिक भीती मनात घर करून राहील त्यासाठी आपला आत्मविश्वास टिकवून ठेवण्याची गरज आहे. प्रयत्नांमध्ये कमी पडू नका यशाची परंपरा कायम राहील.

तुळ - योग्य विचार करून शांतपणे सर्व बाबतीतील निर्णय घेणे आवश्यक आहे. इतरांवर आपला प्रभाव पडू शकतो आपली मते इतरांना पटवून देण्यात यश मिळेल.

वृश्चिक - व्यवसाय-धंद्यात नोकरीत प्रगती कारक घटना घडून उन्नती होईल आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर आपली कामे करून घ्याल. आत्मविश्वास वाढेल.

धनु - व्यवसाय धंद्यातील तसेच दीर्घकाळ रखडलेली येणी वसूल होऊ शकतात मात्र वाद-विवाद टाळा कोणताही लहान-मोठा निर्णय घेताना विचार करा. खरेदी करू शकाल.

मकर - सहकारी स्वरूपाची कामे विनाविलंब होऊ शकतात त्यामुळे तशा स्वरूपाची कामे करण्यासाठी घाई करून लक्ष द्या एखाद्या माहित नसलेल्या गोष्टीत स्वारस्य घेऊ नका.

कुंभ - आपल्या कामांकडे लक्ष ठेवा इतरत्र वेळेचा अपव्यय करू नका आपला मूळ उद्देश लक्षात ठेवा. विवाह ठरण्यात यश मिळेल वाटाघाटी यशस्वी होतील.

मीन - खर्चामध्ये अचानक झालेली वाढ आश्चर्यचकित करेल अवास्तव तसेच अनावश्यक खर्च टाळा. इतरांच्या बोलण्यात येऊ नका. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in