मेष - चालू नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास आपल्याला चांगली नोकरी मिळू शकेल ज्यांना नोकरी नाही अशांना नोकरी मिळेल.
वृषभ - कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्य घडेल त्यानिमित्ताने जवळचे नातेवाईक भाऊ-बहीण त्यांची भेट होईल मनावरचा ताण जाईल सहलीच्या निमित्ताने फिरण्याचा योग येईल.
मिथुन - कौटुंबिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील विशेषतः मुलांकडे लक्ष द्या आपण पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरेल आर्थिक आवक चांगली राहील.
कर्क - जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील जोडीदार आपल्याला आपल्या सर्व कामात मदत करेल घरात पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करेल त्यामुळे धांदल राहील.
सिंह - अनेक महत्त्वाची कामे आपण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहात त्यात यश मिळेल आर्थिक गुंतवणूक करताना विश्वास व हितचिंतक असलेल्या व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या.
कन्या - आपल्या चालू नोकरीत आपल्या अंगावर घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली त्यामुळे वरिष्ठांचा आपल्यावरील विश्वास वाढेल त्याचे फायदे अनेक होतील.
तुळ - धनलाभाचे योग आहेत अपेक्षित पण पैसे मिळतील हाती अतिरिक्त पैसा आला म्हणून तो लगेच खर्च करून टाकू नका गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या व्यक्तींचा सल्ला घ्या.
वृश्चिक - मित्रमंडळींच्या समवेत पर्यटन मौजमजा करण्याच्या मूडमध्ये असाल त्यादृष्टीने आरामदायक प्रवास व मनोरंजन होईल हाती पैसा असेल.
धनु - अनुकूल ग्रहमानाचा फायदा मिळेल आळस झटकून कामाला लागा प्रयत्नात कमी पडू देऊ नका. नियोजन बद्ध पद्धतीने काम केल्यास ती लवकर पूर्ण होतील मुलांची प्रगती होईल.
मकर - आज महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल त्याचा दूरगामी फायदा होईल पैशाची आवक चांगली राहून मौजे वर खर्च करू शकाल काहींना प्रवास करावा लागेल.
कुंभ - प्रत्येक कामात यश मिळेलच असे नाही त्यामुळे महत्त्वाच्या कामांना हात घालू नका जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल.
मीन - कुटुंबात आनंदी वातावरण राहून मुलांबद्दल चांगल्या वाढता मिळतील जोडीदाराशी नात्यात गोडवा राहील प्रेमात यश मिळेल .