आजचे राशिभविष्य, २९ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 29, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढतील त्यासाठी खर्च करावा लागेल मित्रमंडळींच्या वर्तुळातून आर्थिक मदतीची विचारणा होऊ शकते.

वृषभ - कुटुंबात एखादी मंगल कार्याचे नियोजन होईल आप्तेष्ट नातेवाईक यांच्या संपर्कात याल. व्यवसाय धंदा तसेच नोकरीतील परिस्थिती समाधान कारक राहील.

मिथुन - समाजातील मान्यवरांच्या ओळखी मध्ये वाढ होईल लोकसंपर्क वाढेल तसेच महत्त्वाच्या कामांमध्ये ओळखी मध्यस्थी - उपयोगी पडतील. कौटुंबिक सुख लाभेल.

कर्क - काही आश्चर्यकारक घटना घडतील. नशीब पूर्णपणे साथ देईल. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल पण त्यासाठी नियोजन आवश्यक ठरेल.

सिंह - दीर्घकाळ प्रलंबित असलेली सरकारी तसेच कायदेविषयक कार्य गतीमान होतील. जमीन जुमला तसेच स्थावर मालमत्ता इत्यादी संबंधित थांबलेले व्यवहार पुढे जातील.

कन्या - कुटुंब परिवारात मानसिक समाधान देणाऱ्या व आनंद देणाऱ्या वार्ता मिळतील कौटुंबिक सुख लाभेल. जोडीदाराचे म्हणणे किंवा मत बरोबर ठरेल.

तुळ - निरनिराळ्या मार्गांनी अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसाय धंद्यात असलेली येणी वसूल होतील आपली कर्जे चुकती करू शकाल.

वृश्चिक - नोकरी धंदा व्यवसाय यामधील आपले कार्यक्षेत्र वाढणार आहे मात्र आपल्या कार्यक्षेत्राच्या मयदित राहूनच आपली कार्ये पूर्ण करा. जबाबदाऱ्या वाढतील.

धनु - समाजातील मान्यवरांच्या सहवासात राहता येईल त्यांच्या विचारांनी प्रभावित व्हाल. कुटुंबात जोडीदाराशी मतभेद संभवतात वाद-विवाद टाळलेले चांगले.

मकर - मोठी कार्य हातून घडतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. चिंता मिटतील. मात्र आपल्या वागण्यात आणि बोलण्यावर नियंत्रण हवे इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या.

कुंभ - कुटुंबातील समस्या आपण सोडवाल. मुलांच्या प्रश्नात लक्ष घालाल. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे मानसिक समाधान लाभेल.

मीन - मित्रमंडळींबरोबर दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रमंडळी तसेच कुटुंबाबरोबर प्रवासाचे बेत आखाल.

logo
marathi.freepressjournal.in