आजचे राशिभविष्य, ३ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 3, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आवडत्या माणसा बरोबर दिवस चांगला जाईल गृहसौख्य उत्तम लाभेल ठरवलेल्या गोष्टींवरून मागे हटू नका मोठी स्वप्ने साकार होतील सामाजिक क्षेत्रात नावलौकिक वाढेल.

वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याची छाप पडेल इतरांवर प्रभाव पडेल नियोजन सफल होईल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील चांगली संधी मिळू शकते विरोधकांवर अंकुश ठेवाल. प्रवासाचे योग.

मिथुन - आपल्या कार्यक्षेत्रात नियोजन केल्यास महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल व्यापार व्यवसायामध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळतील नवीन केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील.

कर्क - बहुतेक सर्व कामात यश मिळेल. भाग्य साथ देईल. कर्ज संबंधीच्या समस्या सुटतील. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकते. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.

सिंह - महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल सर्व बाबतीत यश मिळेल मात्र प्रयत्न सोडू नका. कुटुंब परिवारात उत्साहाचे वातावरण राहील आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील जोडीदाराची साथ मिळेल.

कन्या - आपल्या रोजच्या कामात आपण कार्यमग्न राहावे जीवनाला नवी दिशा देण्याचा मानस राहील विद्यार्थ्यांनी इतरत्र वेळ घालवू नये तसेच कुसंगत टाळावी.

तुळ - एखादी महत्त्वाची बातमी कळेल त्यामुळे आपल्याला केलेल्या नियोजनात आयत्या वेळेस बदल करावा लागेल धावपळ होण्याची शक्यता मालमत्तेविषयी लाभदायक गोष्टी घडू शकतात.

वृश्चिक - मालमत्ते विषयीचे प्रश्न सुटू शकतील. ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील जोडीदाराची साथ मिळेल कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकते. प्रकृतीकडे लक्ष द्या.

धनु - क्रीडा व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रगती करण्याची संधी मिळेल आपले कर्तुत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील जीवनसाथी साथ मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील.

मकर - महत्त्वाची कामे करताना काही अडथळे येतील. विलंब लागू शकतो. विशेषतः सरकारी कामांमध्ये पैसे व वेळ खर्च होईल. कुटुंबामध्ये वाद विवाद करू नका.

कुंभ - सर्वच क्षेत्रातील जबाबदारी आपल्याला पार पाडाव्या लागणार आहेत .नियोजन महत्त्वाचे ठरेल आरोग्याबाबत जागरूक रहा रागावर नियंत्रण ठेवा सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा.

मीन - रोजच्या कामात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नवीन वस्तू खरेदी करू शकाल. काही नवीन ओळखी होण्याची शक्यता. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल.

logo
marathi.freepressjournal.in