आजचे राशिभविष्य, ३ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 3, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 

मेष - तुमचे जागेचे प्रश्न सुटतील काहींना जुन्या मालमत्ते पासून फायदा कागदोपत्री व्यवहार मात्र नीटनेटकेपणाने करणे आवश्यक. बोलण्यावर नियंत्रण ठेवा ,कधी आपण जास्तच बोलून जाता.

वृषभ - पती-पत्नीमधील संबंध सुधारतील, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, मुलांना पण घरचे ओढ वाटेल. कोणाचाही अपमान होणार नाही याची मात्र दक्षता घेणे आवश्यक.

मिथुन - मनाला दिलासा देणाऱ्या घटना घडू शकतात. आपल्या व्यवसायात व्यापारात अपेक्षित सुधारणा दृष्टिपथात येतील. शांतचित्ताने महत्त्वाचे निर्णय घ्या.

कर्क - व्यापार-व्यवसायात मोठ्या उलाढाली करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, मात्र आपण आत्मविश्‍वासपूर्वक काम करणार आहात. महत्त्वाची कामे करून घ्या.

सिंह - नियोजनपूर्वक काम कराल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात आवड निर्माण राहिल शिक्षण क्षेत्रात काम कराल. लांबचे प्रवास होऊ शकतात.

कन्या - सहकार्याचे धोरण ठेवणे आवश्यक आहे, कोणत्याही परिस्थितीत अडवणुकीचे धोरण आपणास कार्यामध्ये अडचणी आणू शकतात. समझोत्याची बोलणे विचारपूर्वकच करा.

तुळ -भागीदाराची सलोख्याचे संबंध राहतील.भागीदारीतून आपणाला अपेक्षित फायदे मिळू शकतात. छोटे प्रवास होतील. व्यापार व्यवसायात वृद्धी कराल.

वृश्चिक - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. खर्चाचे नियोजन हवे कुटुंबामध्ये वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. मनाला निराशा येऊ देऊ नका.

धनु - कोणत्याही कामास धैर्याने समोर जाल. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध होतील. नातेवाईकांच्या सलोख्याच्या संबंध आहे तुमचे स्वतःचे मनोबल वाढेल.

मकर - घरातील छोटी-मोठी कामे करून घ्या. आईचा सल्ला मोलाचा ठरणार आहे. दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. दक्ष राहणे महत्वाचे ठरेल.

कुंभ - तुमचे स्वतःचे निर्णय योग्य ठरणार आहेत. व्यापार व्यवसाय संबंधी नवीन संधी घ्यावयाच्या किंवा नाही ते स्वतः पहा, कोणावरही अवलंबून राहू नका.

मीन - कोणत्याही मोठ्या इन्व्हेस्टमेंट चे निर्णय आज घेऊ नका. काम करताना चुका होत नाहीत ना याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कर्ज घेणे आणि देणे याचे व्यवहार आज होऊ शकतात .

logo
marathi.freepressjournal.in