मेष - आपल्या व्यापार व्यवसाय मध्ये आपण चांगले काम करणार आहात. आपल्या कामांमध्ये अडचणी आल्यास आपले मित्र व सहकारी आपल्याला सहाय्य करणार आहेत .
वृषभ - आपल्या नोकरी व्यवसाय मध्ये नवीन कल्पना सुचतील. त्या अमलात आणल्यामुळे आपल्याला कामामध्ये प्रगती झाल्याचे आढळून येईल. आपली महत्त्वाची कामे सुरळीत होणार आहेत.
मिथुन - व्यापार व्यवसायात आपल्या चांगली वाढ होणार आहे. व्यवसाय मध्ये अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे.आर्थिक लाभाचे प्रमाण वाढल्यामुळे खर्चही वाढतील.
कर्क -आजचा दिवस आपणास सुखसोयींचा जाणार आहे. स्वतःच्या कामांमध्ये अडचणी दूर होणार आहेत. पैशाचे हे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे देणी दिली जातील.
सिंह -अनपेक्षित खर्च वाढणार आहेत. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. काही निर्णय तडजोड करूनच घ्यावे लागतील. शांतपणे विचार करा. आपल्या काही तत्वांना आळा घालावा लागणार आहे.
कन्या - कामाची धावपळ चालू राहणार आहे. एकाच विचारात अडकून नका. कामाचे नियोजन करा म्हणजे काम दोनदा करावे लागणार नाही. नोकरीमध्ये चांगले वातावरण असणार आहे.
तुळ - प्रलंबित कामांना गती मिळणार आहे. मन प्रसन्न असणार आहे. जिभेचे चोचले पुरवताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घरातल्या समस्यांमध्ये अडकू नका.
वृश्चिक - नोकरी मध्ये स्वतःच्या मनासारखे वातावरण राहणार आहे कामामध्ये लक्ष केंद्रीत राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. प्रभास होण्याची शक्यता. मनासारख्या घटना घडतील.
धनु -आजचा दिवस मिश्र स्वरूपाचे जाणार आहे. नोकरी व्यवसाय मध्ये जास्त काम पडणार आहे. कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. आपण आपले काम प्रलंबित करू नका. शक्यतो प्रवास टाळा.
मकर - मुलांच्या अडचणी काही असतील तर त्या फार जवळून समजून घ्या. त्यांना पुरेसा वेळ द्या. त्यांच्याशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. आपल्या योजना कार्यान्वित होणार आहेत.
कुंभ - आपल्या ग्रह सौख्यात वाढ होणार आहे. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती ची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाजू चांगली राहणार आहे.
मीन - आपल्या कामामध्ये प्रगती होणार आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. त्यांच्या भेटीगाठी होऊन आनंद मिळणार आहे. एखादी चांगली बातमी कळणार आहे.