मेष : कुटुंबात आपल्या मतास प्राधान्य दिले जाईल मान मिळेल. मंगल कार्य ठरतील. नोकरीच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल मात्र व्यवसायात काही महत्त्वाची कामे निघतील .
वृषभ : महत्वाच्या बातम्या समजतील बाहेरील कामात संतुलन साधत काम पूर्ण कराल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील जीवन साथी चे सहकार्य अपेक्षेनुसार मिळेल.
मिथुन : शैक्षणिक क्षेत्रातील जातकांना उत्तम कालावधी. प्रगती करू शकाल चांगले वाचन होईल साहित्यक्षेत्रातील जातकांना मानसन्मान मिळेल.अपेक्षित पत्रव्यवहार होईल.
कर्क : महत्वाचे निरोप मिळतील हाती घेतलेली महत्त्वाची कामे पूर्ण होतील.आर्थिक परिस्थिती चांगली राहील दगदग होईल अशी कामे करू नका आपल्याला झेपतील तेवढीच कामे करा.
सिंह : नोकरीत कुटुंबात कार्यस्थळी महत्त्वाच्या विषयात तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल तुमचे महत्त्व वाढेल तुमच्या कामाची कदर केली जाईल जोडीदाराशी चांगले संबंध राहतील.
कन्या : ठरलेल्या नियोजनात आयत्या वेळेस बदल करावा लागेल काही अडचणी येण्याची शक्यता आहे. नोकरीत मनासारख्या घटना घडतील जीवनसाथी शिव मधुर संबंध राहतील.
तुळ : व्यवसाय-धंद्यात नोकरीतआपले अंदाज बरोबर ठरल्यामुळे आपले महत्त्व वाढेल कुटुंबातील मुलांना यश त्यामुळे घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील पैशाची आवक चांगली राहील.
वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.साहसी व पराक्रमी वृत्ती दिसेल.व्यवसायात फायद्याचे सौदे हाती येतील.नोकरीत सर्व-सामान्य परिस्तिथी राहील.भागीदारी च्या व्यवसायात मतभेद टाळा.
धनू : सामाजिक-धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. एखाद्या समारंभात महत्वपूर्ण पद भूषवाल. कोटुंबिक परिस्थिती आनंदी राहील. मित्र-मंडळींचे सहकार्य लाभेल.
मकर : हाताखालील मंडळींचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. मुला-मुलींच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणे क्रमप्राप्त ठरेल. काही वेळेस अचानक खर्चाच्या बाबी पुढे आल्यामुळे खर्च करावा लागेल.
कुंभ : नोकरीमध्ये कामाचे स्वरूप बदलू शकते. तसेच स्थान बदल सुद्धा घडू शकतो. जबाबदाऱ्या वाढतील. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपवला जाऊ शकतो.
मीन : अपेक्षित कामे होतील. काही वेळेस आपले अंदाज चुकू शकतात. घरात आनंदी वातावरण राहून घरातील मुला मुलींकडून त्यांच्या प्रगतीबाबत वार्ता कानी आल्यामुळे समाधानी रहाल.