आजचे राशिभविष्य, ४ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December ४, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - मनोरंजनाकडे कल राहून मित्रमंडळींच्या समवेत दिवस मजेत जाईल. व्यसनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. कुसंगती टाळा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

वृषभ - कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे नियोजन करू शकाल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. अनेकानेक मार्गाने धन आगमनाची शक्यता.

मिथुन - महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिवस आनंदात जाईल नव्या ओळखी होतील. मात्र आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज. कोणाच्या वादविवादात पडू नका.

कर्क - समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभून मार्गदर्शन मिळेल. जुने मित्र भेटल्यामुळे आनंद व उत्साह वाढेल. कर्क राशी चंद्राची रास आहे त्याचप्रमाणे कर्क रास जलतत्त्वाची सम रास आहे.

सिंह - मानसन्मानाची वृद्धी होईल. नोकरीत अधिकार वाढतील. आपले मत महत्त्वाच्या कामात विचारात घेतली जाईल. वरिष्ठांशी संबंध दृढ होतील .

कन्या - कार्यस्थळी व्यवसायात इतरांची मदत मिळाल्यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.

तुळ - कुटुंबातील मोठ्या लोकांचा आशीर्वाद लाभून त्यांच्याकडून मदत तसेच मार्गदर्शन मिळेल.व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नोकरीमध्ये कार्यक्षेत्रामध्ये तसेच अधिकारात ही वाढ होईल. आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याची आवश्यकता.

धनु - महत्त्वाची कामे पुढे ढकलावी त्याचप्रमाणे प्रवासही टाळावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा इतरांच्या मतास प्राधान्य द्या.व्यवसायिक परिस्थिती समाधान कारक राहील.

मकर - इतरांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व बोलण्याचा प्रभाव पडेल. प्रलंबित कामे होऊ शकतात आळस करू नका आजचे काम उद्यावर ढकलू नका.

कुंभ - बऱ्याच दिवसांनी जुने मित्रमंडळी भेटतील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आठवणीत रमून जाईल. नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील.

मीन - आपण घेतलेले महत्त्वाचे निर्णय अचूक ठरून त्याचा फायदा होईल कौटुंबिक सौख्य लाभेल मुलांकडून शुभवार्ता मिळतील. दिवस चांगला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in