मेष - एका वेळी अनेक कामं करू नका. कामाचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. जास्त कामाचा शीण येऊ शकतो. फालतू कामांमध्ये वेळ जाणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
वृषभ - कामाची निश्चित दिशा ठरवून कामाला सुरुवात करणार आहात आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे कामाचे नियोजनही व्यवस्थितच करणार आहात.
मिथुन -आज आपण आपल्या पेंडिंग कामाला महत्त्व द्या. कामे पूर्ण होण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार करूनच कामे ठरवा. नोकरी मध्ये चांगली स्थिती राहील.
कर्क -आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा. व्यापार व्यवसायिकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कामाचे पुढचे प्लॅन तयार ठेवा, नवी काम मिळण्याची शक्यता आहे.
सिंह - स्वतःमध्ये उत्साह आणि उमेद कमी वाटण्याची शक्यता आहे. पण सातत्याने काम करावे. कामामध्ये घाई करू नका. जोडीदाराकडून आपणास मदत मिळेल.
कन्या - वैवाहिक जीवनात विसंवाद होण्याची शक्यता आहे, तो होणार नाही याची काळजी घ्या. वाद-विवाद वाढण्याची शक्यता असल्याने मन शांत ठेवून जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
तुळ - नोकरीमध्ये सहकारी कामाची चालढकल करण्याची शक्यता आहे त्याकडे तुम्ही स्वतः लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा कामे पडून राहतील, वेळेत काम होणार नाही.
वृश्चिक - मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. त्यांचे व तुमचे काही मतभेद असतील तर ते दूर करणे आवश्यक आहे, सकारात्मक संवादाने गैरसमज दूर होणार आहेत.
धनु - कुटुंबातील वातावरण जरा खराब असेल ,त्यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्ती तसेच भावंड यांच्याशी सुसंवाद करा. कौटुंबिक सौख्य लाभेल आर्थिक सुरेश मिळेल.
मकर - नातेवाईक किंवा भावंडं यांना मदत करावी लागेल, ही मदत आर्थिकदृष्ट्याही असू शकते. घरातील जोडीदाराची समजूत घालावी लागेल. स्वतःच्या कामात यश येणार आहे.
कुंभ - दैनंदिन कामे सुरळीत पणे होतील. एखादी महत्वाची बातमी समजू शकते. त्यामुळे कुटुंबातील वातावरण चांगले असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे.
मीन -आपण आज उत्साहाने काम करायला सुरुवात करणार आहात. काम करताना समाधान प्राप्त होईल. निराशा गेल्यामुळे उत्साही व आनंदी राहणे आवडेल.